
तर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी हे तसेच लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघांचे वडील एकाच कंपनीत काम करत होते. दोन्ही कुटुंबात घरोबा पण होता. पण पुढे दोन्ही कुटुंबाचा संपर्क तुटला. 2007 मध्ये ते पुन्हा संपर्कात आले. धोनी आणि साक्षी हिची भेट बऱ्याच वर्षांनी कोलकत्ता येथील ताज बंगाल हॉटेलमध्ये झाली. साक्षी तिथे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रशिक्षाणार्थी म्हणून काम करत होती. तर धोनी हा भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान या हॉटेलमध्ये थांबला होता. एका मित्रामुळे त्यांची भेट झाली. साक्षीला पाहताच धोनी तिच्यावर फिदा झाला. त्याने लागलीच तिचा मोबाईल क्रमांक मागितला आणि तिला मॅसेज ही करून टाकला. पुढे दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. नंतर धोनीच्या कुटुंबांने साक्षीला पसंती कळवली आणि दोघे जीवनसाथी झाले.
या दोघांनी 3 जुलै, 2010 रोजी डेहराडूनमध्ये एका छोट्या समारंभात, काही मोजके मित्र आणि नातेवाईकांच्या साक्षीने अगोदर साखरपुडा आणि नंतर दुसऱ्या दिवशी लागलीच लग्न झाले. या लग्नसोहळ्याला हरभजन सिंग, जॉन अब्राहम आणि इतर काही क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटी उपस्थित होते.
साक्षी अनेकदा सामन्यावेळी उपस्थित असल्याचे दिसून येते. ती त्याला कायम प्रोत्साहन देत आली आहे. या दोघांच्या नात्यात प्रसिद्धीचा, श्रीमंतीचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाही. हे दोघे लाईमलाईटपासून कायम दूर असतात. या दोघांची प्रेम कहाणी ही धोनीचा बायोपिक “एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी” (2016) मध्ये दाखवण्यात आली आहे. त्यात या दोघांची भेट कशी झाली ते लग्न आणि त्याचा संघर्ष चित्तारलाय.
सासू सांभाळते कंपनी
शीला सिंह या धोनीची सासू आहे. पत्नी साक्षीची ती आई आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी यांच्या एंटरटेनमेंट लिमिटेडचे व्यवस्थापन शीला सिंह यांच्या हातात आहे. शीला सिंह या मल्टी-बिलियन-डॉलर कंपनीचे व्यवस्थापन पाहतात. 2020 मध्ये साक्षी धोनी आणि तिची आई शीला सिंह या दोन्ही धोनी एंटरटेनमेंट प्राईव्हेट लिमिटेडच्या कामात लक्ष घालतात.