
भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा खेळाशिवाय तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोनवेळा सुवर्णपदक विजेती कामगिरी करणाऱ्या मनिका बत्राने जाहीरात विश्वात एक मोठी डील केली आहे.

दक्षिण आशियाई गेम्समध्ये तीनवेळा चॅम्पियन राहिलेल्या मनिकाला क्रीडा साहित्य बनवणाऱ्या आदिदास कंपनीने आपलं ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं आहे. त्यासाठी मनिकाने तिचं ग्लॅमरस फोटोशूटही केलं.

आदिदास कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडर रोस्टरमध्ये मनिकाशिवाय अन्य क्रीडापटूही आहेत.

वेटलिफ्टर मीरबाई चानू, बॉक्सर लवलीन बोरगोहेन, धावपटू हिमा दास आणि बॉक्सर निखत जरीन अशा काही स्टार महिला अॅथलीटसही आदिदासच्या ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.

मनिका बत्राला ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त करण्यामागे महिलांच सशक्तीकरण आमचं लक्ष्य असल्याचं आदिदासने सांगितलं.

भारतीय महिलांना स्वप्न साकार करण्यासाठी पाठबळ देणं आणि क्रीडा क्षेत्रात त्यांना शिखरावर जाण्यासाठी मदत करणं हे आमचं उद्दिष्टय आहे, असं आदिदासकडून सांगण्यात आलं.

मनिका बत्राने 2018 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकली होती. एक पदक महिला टीम इवेंट आणि सिंगल्समध्ये दुसर पदक मिळवलं होतं. याच स्पर्धेत मनिकाने डबल्समध्ये रौप्य आणि मिक्स डबल्समध्ये ब्राँझ पदक जिंकलं होतं.

मनिका बत्रा 2020 समर ऑलिंपिक स्पर्धेत महिला सिंगल्समध्ये तिसऱ्या राऊंडपर्यंत पोहोचली होती. तिसऱ्या राऊंडपर्यंत पोहोचणारी ती भारताची पहिली महिला टेबल टेनिस प्लेयर बनली होती.

मनिका बत्राला 2020 मध्ये ध्यानचंद क्रीडा पुरस्कारनेही सन्मानित करण्यात आले. त्यापूर्वी दोन वर्ष आधी 2018 मध्ये तिला अर्जून पुरस्कार मिळाला होता.