MI vs CSK : मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनी रिव्ह्यू सिस्टमची पुन्हा चर्चा, डिआरएसनंतर पंच झाले फेल Watch Video

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स 34 व्यांदा आमनेसामने आले आहेत. मागच्या 34 सामन्यात मुंबईने 20 तर चेन्नईने 14 सामन्यात विजय मिळवला आहे.

MI vs CSK : मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनी रिव्ह्यू सिस्टमची पुन्हा चर्चा, डिआरएसनंतर पंच झाले फेल Watch Video
MI vs CSK : मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनी रिव्ह्यू सिस्टमची पुन्हा चर्चा, डिआरएसनंतर पंच झाले फेल Watch Video
Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 08, 2023 | 8:37 PM

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेच्या 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. सुरुवातीला रुळावर असलेली मुंबईचे गाडी रुळावरून एक एक डब्बे करत घसरली. इतकंच काय तर दोन गडी बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. पण त्यालाही खास करता आलं नाही. पंचांनी नाबाद दिलं खरं पण स्टंपपाठी धोनी असताना कसं काय होऊ शकतं. काही क्षणात रिव्ह्यू घेतला आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

रोहित शर्मा आणि इशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला पण हजेरी लावून पुन्हा निघून गेला. त्याला या सामन्यातही सूर गवसला नाही. 2 चेंडूत अवघी 1 धाव करून बाद झाला. पंचांनी त्याला नाबाद दिलं होतं. पण मैदानात धोनी असेल तर डीआरएसचं काय सांगता येत नाही. पंचांचा निर्णयानंतर लगेचच धोनीने रिव्ह्यू घेतला. मग काय पंचांचा निर्णय चुकीचा ठरला आणि सूर्यकुमार यादव बाद झाला. डीआरएस म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टम याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

सूर्यकुमार यादव तंबूत पोहोचत नाही तोच कॅमरून ग्रीन बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेलं घेतला. चेंडू इतक्या वेगाने होता की पंचही मैदानावर झोपलं. पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोच झेल जडेजाच्या हातात होता. अर्शद खानही चांगली कामगिरी करू शकला नाही. मिशेल सॅटनरच्या गोलंदाजीवर अर्शद खान एलबीडब्ल्यू झाला.

तिलक वर्माही काही खास करू शकला नाही. त्याच्या रुपाने सहावा गडी बाद झाला आणि डीआरएसही वाया गेला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 18 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्या.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.