IND vs NZ: मालिका भारताने जिंकली पण टेंबा मिरवतोय न्यूझीलंडचा कॅप्टन सँटनर, मॅचनंतर मारल्या मोठ मोठ्या बात्या

Mitchell Santner On IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका रंगली जी भारतीय संघाने जिंकली पण न्यूझीलंडच्या कर्णधाराने स्वत:चाच मिरवला टेंबा कसा ते पाहा...

IND vs NZ: मालिका भारताने जिंकली पण टेंबा मिरवतोय न्यूझीलंडचा कॅप्टन सँटनर, मॅचनंतर मारल्या मोठ मोठ्या बात्या
| Updated on: Nov 01, 2026 | 6:18 PM

Mitchell Santner On IND vs NZ: भारत न्यूझीलंड यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. भारतीय संघाने ३-२ ने मालिका जिंकली. सुरवातीचे तिन्ही सामने जिंकले पण नंतरच्या दोन सामन्यात अतिशय घाणेरडी कामगिरी भारतीय संघाची पाहायला मिळाली. आता शेवटचा टी-२० सामना जिंकल्यानंतर किवी संघ मिचेल सँटनरने विधान केले आहे.

हॅमिल्टन येथे भारताविरुद्धचा पाचवा आणि अंतिम टी२० सामना जिंकल्यानंतर, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने मालिकेबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले. मालिका ३-२ ने गमावूनही, किवी कर्णधार आपल्या संघाच्या कामगिरीवर खूप समाधानी दिसत होता. सँटनर म्हणाला की, “क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या दोन अटीतटीच्या सामन्यांकडे मागे वळून पाहताना, मला वाटते की न्यूझीलंडने ते सामने जिंकायला हवे होते. जर त्या संधींचा फायदा घेतला असता, तर मालिकेचा निकाल वेगळा लागला असता.”

Loading...

सँटनर म्हणाला की, ” क्रिकेटच्या दृष्टिकोनातून, या मालिकेने माझ्या संघासाठी अनेक सकारात्मक गोष्टी आणल्या आहेत. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर, माझ्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी शेवटच्या दोन सामन्यांमध्ये परिस्थितीशी जुळवून घेत आणि अपवादात्मकपणे चांगली कामगिरी करत उल्लेखनीय पुनरागमन केले.”

मालिकावीर ग्लेन फिलिप्सचे कौतुक करताना सँटनर म्हणाला की, “भारतासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध प्रत्येक सामन्यात सातत्याने धावा करणे ही एक खूप विशेष गोष्ट आहे. फिलिप्स सुरुवातीला थोडा वेळ घेतो आणि मग मैदानाच्या सर्व बाजूंनी फटकेबाजी करतो. संपूर्ण मालिकेत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यास आणि २६० धावांचा डोंगर उभारण्यास मदत करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.”

आपल्या संघाच्या गोलंदाजीतील खोलीबद्दल बोलताना मिचेल सँटनर म्हणाला की,” व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक नवीन आणि राखीव खेळाडूंना त्वरित प्रभाव पाडण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची आपली तयारी सिद्ध करण्याची संधी मिळाली. भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळाडूंकडून मिळणारी ही शिकवण आणि त्यांचा उदय, पुढील दोन वर्षांत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी न्यूझीलंड क्रिकेटकरिता एक अत्यंत उत्साहवर्धक चिन्ह आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us