AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिच्यासोबत मोहम्मद सिराजच्या अफेअरची होती चर्चा, तिनेच बांधली राखी; रक्षाबंधनचा व्हिडीओ व्हायरल

टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद सिराजचा काही महिन्यांपूर्वी एका मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता त्याच मुलीने सिराजला रक्षाबंधनला राखी बांधली आहे.

जिच्यासोबत मोहम्मद सिराजच्या अफेअरची होती चर्चा, तिनेच बांधली राखी; रक्षाबंधनचा व्हिडीओ व्हायरल
मोहम्मद सिराज, जनाई भोसलेImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 10, 2025 | 8:55 AM
Share

इंग्लंडमधील कसोटी सीरिजमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या ब्रेकवर आहे. टीमच्या इतर खेळाडूंप्रमाणेच सिराजसुद्धा त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. हा ब्रेक सिराजसह टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी अत्यंत चांगल्या वेळी आला आहे. कारण सर्वांनाच कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन साजरं करण्याची संधी मिळाली. सिराजनेही हैदराबादमधील त्याच्या राहत्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. विशेष म्हणजे ज्या मुलीशी त्याच्या प्रेमसंबंधाच्या अफवा पसरू लागल्या होत्या, तिनेच त्याला राखी बांधली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिराजने शनिवारी 9 ऑगस्ट रोजी सर्व देशवासीयांप्रमाणेच रक्षाबंधन साजरा केला. यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेनं सिराजला राखी बांधली. जनाईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी सिराज आणि जनाई यांच्या अफेअरच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. जनाईच्या वाढदिवसाच्या पार्टीतील या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. सिराज आणि जनाईला त्या फोटोमध्ये पहिल्यांदा एकत्र पाहिलं गेलं होतं. तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

अफेअरच्या चर्चांना सिराज आणि जनाईने वेळोवेळी नाकारलं होतं. आता रक्षाबंधनच्या निमित्त जनाईने सिराजला राखी बांधतानाचा फोटो शेअर करत त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जनाईने सिराजला ‘प्रिय भाऊ’ असं म्हटलंय, तर सिराजनेही तिचा फोटो शेअर करत ‘जनाईसारखी दुसरी कोणती बहीण नाही’ अशा शब्दांत कौतुक केलंय.

सिराजबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या यशात सिराजने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाच कसोटी सामन्यात त्याने सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या होत्या. विशेषत: ओव्हल इथं खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत सिराजने दुसऱ्या डावात पाच विकेट्ससग एकूण 9 विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाला 6 धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला.

जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. विविध कार्यक्रमांमध्ये ती आजी आशा भोसले यांच्यासोबत उपस्थित असते. तर काही पार्ट्यांमध्ये तिला बहीण श्रद्धा कपूरसोबतही पाहिलं गेलंय. जनाईचं सौंदर्य हे कोणत्याही अभिनेत्रीला, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स यांनाही टक्कर देणारं आहे.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?