MS Dhoni New Home: धोनी रांचीत उभारतोय 40 कोटींचं आलिशान घर; महालात काय-काय असणार? घराची पहिली झलक समोर, पाहा VIDEO

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी रांचीमध्येच आपले तिसरे घर बांधत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, कॅप्टन कूल धोनीचे हे घर दोन एकरात बांधले जात आहे. हा रांचीमधील रिंग रोड जवळील सिंम्बो हिल परिसरात धोनीचा आलिशान बंगला बांधला जात आहे.

MS Dhoni New Home: धोनी रांचीत उभारतोय 40 कोटींचं आलिशान घर; महालात काय-काय असणार? घराची पहिली झलक समोर, पाहा VIDEO
MS Dhoni News
| Updated on: Nov 29, 2026 | 8:40 PM

MS Dhoni New House Video:  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी त्याच्या खेळीसोबतच लक्झरी लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असतो. धोनीचे बाईकप्रेम तर जगजाहीर आहे. त्याच्या रांचीमधील फार्म हाऊसमध्ये त्याने फक्त बाईक्ससाठी आलिशान शोरुम तयार केले आहे. धोनीच्या रांचीमधील घराचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता कॅप्टन कूल धोनी रांचीमध्येच नवीन घर बांधत असल्याची माहिती समोर आली आहे.

धोनी बांधतोय नवीन घर.. पहिली झलक पाहाच..! 

Loading...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी रांचीमध्येच आपले तिसरे घर बांधत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, कॅप्टन कूल धोनीचे हे घर दोन एकरात बांधले जात आहे. हा रांचीमधील रिंग रोड जवळील सिंम्बो हिल परिसरात धोनीचा आलिशान बंगला बांधला जात आहे. अलिकडेच धोनीने या घराला भेट दिली होती. त्याचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या या नव्या घरामध्ये प्रायव्हेट जीम, स्विमिंग पूल यासोबतच इनडोअर खेळांसाठी मोठे ग्राऊंड तयार केले जाणार आहे.

यासोबतच या घरामध्ये त्याने पाळलेले घोडे, तसेच इतर पाळीव प्राण्यांसाठीही वेगळे मैदान केले जाणार असल्याची चर्चा आहे. धोनीचे आधीचे रांचीमधील घर जे कैलाशपती नावानेही ओळखले जाते ते तब्बल सात एकरात विस्तारले आहे. या आलिशान फार्म हाऊसमध्ये क्रिकेट सरावासाठी नेट, लॉन, यासोबतच स्विमिंग पूल, फिटनेस एयर आणि टीमही आहे. याच फार्म हाऊसमध्ये धोनीने त्याच्या कार अन् बाईक्ससाठी शोरुमही तयार केले आहे.

आयपीएलमधूनही निवृत्ती…! 

धोनीच्या क्रिकेट कारकि‍र्दीबाबत बोलायचे झाल्यास त्याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळत होता. अलिकडेच १० दिवसांपूर्वी धोनीने आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली. आता तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा मेंटोर म्हणून भूमिका बजावणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले जाते. क्रिडाविश्वातील सर्व तिन्ही फॉरमॅटमधील विश्वचषक जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us