AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs MI IPL 2026 : दुष्काळात तेरावा महिना, मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यावर BCCI ची कारवाई

KKR vs MI IPL 2026 : हार्दिक पंड्याचे दिवस आधीच खराब सुरु आहेत. काल कोलकाता नाइट रायडर्स कडूनही टीमचा पराभव झाला. त्यात आता हार्दिकवर बीसीसीआयने Action घेतली आहे. हार्दिक पंड्याला या सीजनमध्ये मुंबईच यशस्वी नेतृत्व करता आलेलं नाही.

KKR vs MI IPL 2026 : दुष्काळात तेरावा महिना, मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यावर BCCI ची कारवाई
Hardik Pandya Image Credit source: PTI
| Updated on: May 21, 2026 | 1:01 PM
Share

सध्या हार्दिक पंड्याचे स्टार खराब आहेत. आयपीएल 2026 चा हा सीजन मुंबई इंडियन्ससाठी खूप खराब ठरला आहे. काल कोलकाता नाइट रायडर्स विरूद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या पराभवाने टीमचं फार नुकसान होणार नाहीय. कारण मुंबई इंडियन्सचं टुर्नामेंटमधील आव्हान आधीच संपुष्टात आलय. पण प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकायला पाहिजे होता. हार्दिक पंड्यासाठी टीमच्या पराजयाचं दु:ख आहेच. पण मॅच दरम्यान काल त्याने एक चूक केली. त्यासाठी हार्दिकवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनला BCCI ने दंड ठोठावला आहे. त्या अंतर्गत हार्दिकच्या मॅच फी मधून 10 टक्के रक्कम कापण्यात आली.

कोलकता नाइट रायडर्सची बॅटिंग सुरु असताना 10 व्या ओव्हरमधील ही घटना आहे. या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रन-अप घेण्यासाठी जात असताना हार्दिक पंड्याने स्टम्पसवरील बेल्स पाडून आपला संताप व्यक्त केला. हार्दिक पंड्याला या चुकीसाठी दंड ठोठावण्यात आला. मॅच दरम्यान अशी कृती करुन हार्दिक पंड्याने IPL कोड ऑफ कंडक्टच्या कलम 2.2 चं उल्लंघन केलं. तो दोषी ठरला. त्याने मॅच रेफरी राजीव सेठ यांच्यासमोर आपली चूक कबूल केली. त्यानंतर या विषयात आता पुढील कारवाईची गरज नाहीय.

अशी कामगिरी अपेक्षित नाहीय

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा हार्दिक पंड्या दुसरा फलंदाज आहे. त्याची ही इनिंग खूप स्लो होती. त्याने 27 चेंडूत 26 धावा केल्या. टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी अपेक्षित नाहीय. यात एक सिक्स आणि दोन फोर होते. पंड्याने kkr विरुद्ध 2 ओव्हरमध्ये 13 रन्स दिले. एक विकेटही त्याला काढता आला नाही.

या सीजनमध्ये हार्दिकची कामगिरी कशी आहे?

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध हार्दिक पंड्या आयपीएल 2026 सीजनमधील आपला 9 वा सामना खेळला. या 9 सामन्यात हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने फक्त दोन सामने जिंकले आहेत. या 9 सामन्यात हार्दिक पंड्याने 172 धावा करताना 4 विकेट घेतल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...