कसोटी सामन्यांमध्ये 500 विकेटचं लक्ष्य पूर्ण करणार, ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजाचा आत्मविश्वास

| Updated on: Nov 19, 2020 | 7:28 PM

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लियोननं कसोटी सामन्यांमध्ये 500 विकेट मिळवणे ध्येय असल्याचे म्हटले आहे. (Nathon Lyon said he wanted to take five hundred wickets in Test Cricket )

कसोटी सामन्यांमध्ये 500 विकेटचं लक्ष्य पूर्ण करणार, ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजाचा आत्मविश्वास
Follow us on

मेलबर्न : आस्ट्रेलियाचा मुख्य फिरकी गोलंदाज नॅथन लियोन याने कोरोना संसर्गाच्या काळात क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळं कसोटी सामना खेळण्याची उत्सुकता वाढल्याचे सांगितले. लियोन याने कोरोनामुळं कसोटी सामन्यांच्या रोमांचक खेळापासून दूर राहावं लागलं असं म्हटलं आहे. नॅथन लियोननं याकाळात कसोटी सामन्यांमध्ये 500 विकेट मिळवण्याची उमेद जागृत झाल्याचे सांगितले. (Nathon Lyon said he wanted to take five hundred wickets in Test Cricket )

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाच नॅथन लियोननं आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळले आहेत. नॅथन लियोन सध्या दोन विक्रम प्रस्थापित करण्यापासून काही पावलं दूर आहे. भारताविरुद्धचे सर्व कसोटी सामन्यात नॅथन लियोन खेळल्यास त्याचे 100 कसोटी सामने पूर्ण होतील. तर, कसोटी सामन्यात त्याने 390 विकेट घेतल्या आहेत. 10 विकेट घेतल्यास तो 400 विकेटचा टप्पा पूर्ण करु शकतो.

ऑस्ट्रेलियासाठी ऑफ स्पिनर म्हणून नॅथन लियोननं आतापर्यंत सर्वाधिक बळी घेतले आहेत. ‘फॉक्सस्पोर्ट्स’ शी बोलताना नॅथन लियोन याने अजून उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे म्हटले. ऑस्ट्रेलियासाठी यापुढील काळात योगदान द्यायचे आहे. कसोटी सामन्यात 500 बळी मिळवणे हे ध्येय असल्याचा पुनरुच्चार लियोन यानं केला.

ऑस्ट्रेलियाचा 100 कसोटी खेळणारा 10 वा खेळाडू

भारताविरुद्धच्या सर्व सामन्यात नॅथन लियोनचा समावेश झाल्यास ब्रिसबेन येथील कसोटी सामना 100 वा ठरणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी 100 कसोटी सामने खेळणारा नॅथन लियोन 10 वा खेळाडू ठरणार आहे. लियोन याने अखेरचा कसोटी सामना जानेवारी महिन्यात खेळला आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियन टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .

संबंधित बातम्या :

IND vs AUS | अ‌ॅडिलेडमध्ये कोरोनाने डोकं वर काढलं, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीचं काय होणार?

ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय कसा मिळवायचा, हे आम्हाला चांगलंच माहितीय : चेतेश्वर पुजारा

(Nathon Lyon said he wanted to take five hundred wickets in Test Cricket )