ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय कसा मिळवायचा, हे आम्हाला चांगलंच माहितीय : चेतेश्वर पुजारा

'डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथची संयमी आणि दमदार बॅटिंग ऑस्ट्रेलियासाठी मोठी जमेची बाजू आहे. परंतु या बॅट्समनला रोखण्यासाठी भारताकडे आक्रमक गोलंदाज आहेत', असा विश्वास भारताचा आघाडीचा कसोटी बॅट्समन चेतेश्वर पुजाराने व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय कसा मिळवायचा, हे आम्हाला चांगलंच माहितीय : चेतेश्वर पुजारा
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 1:35 PM

सिडनी : ‘डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथची संयमी आणि दमदार बॅटिंग ऑस्ट्रेलियासाठी मोठी जमेची बाजू आहे. परंतु या बॅट्समनला रोखण्यासाठी भारताकडे आक्रमक गोलंदाज आहेत’, असा विश्वास भारताचा आघाडीचा कसोटी बॅट्समन चेतेश्वर पुजाराने व्यक्त केला आहे. (India Tour Australia Cheteshwar Pujara Challenge Australian Team)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना आव्हानं-प्रतिआव्हानं देत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ आणि अनकॅप प्लेअर मिशेल स्वेप्सनने भारतीय संघाला चॅलेंज केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू देखील ऑस्ट्रेलियन संघाला चॅलेंज देत आहेत.

‘मला भारतीय संघाच्या बोलर्सवर पूर्ण विश्वास आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय बोलर्सचा परफॉरमन्स पाहता ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्याची ताकद भारतीय बोलर्समध्ये आहे. 2018-2019 च्या मालिकेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होऊ शकते, असं पुजाराने म्हटलंय. 2018-2019 च्या कसोटी मालिकेत तीन शतकांसह पुजाराने 500 रन्स काढले होते. ही मालिका ऑस्ट्रेलियात जाऊन भारताने 2-1 ने जिंकली होती.

‘जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्या आक्रमणामुळे 2018-19 च्या मलिकेचे पुनरावृत्ती पुन्हा सिद्ध करण्यास भारतीय संघ सज्ज असेल, असं पुजाराने म्हटलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

‘स्मिथ, वॉर्नर आणि लाबुशेन शानदार खेळाडू आहेत, यात काही शंका नाही. परंतु आमच्यासाठी ही फायद्याची गोष्ट असेल की 2018-19 च्या सिरीजमधील काही खेळाडू आताच्याही संघात आहेत. ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय कसा मिळवायचा, हे आम्ही जाणून आहोत कारण 2018-19 च्या कसमोटी मालिकेत आम्ही विजयाची विजयाची चव चाखली आहे’, असंही पुजारा म्हणाला.

स्टीव्ह स्मिथने टीम इंडियाच्या गोलंदाजांना डिवचलं

टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (INDIA TOUR AUSTRALIA) यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. रवाना झाल्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने (Steve Smith) भारतीय गोलंदाजांना आव्हान दिलं आहे. माझ्याविरोधात जर शॉर्टपीच बॉल टाकण्याचा प्लॅन करणार असाल तर मला त्याची भीती नाही पण तुम्ही करत असलेल्या प्लॅनचा काहीही फायदा होणार नाही, असं म्हणत स्टीव्ह स्मिथने भारतीय बोलर्सला डिवचलं आहे. ( Aus Steve Smith Challenge india pacers)

“माझ्या जीवनात मी एवढ्या शॉर्टपीच बॉलचा सामना केलाय की आता मला कसलीही चिंता वाटत नाही. भारतीय बोलर्स जर माझ्याविरोधात शॉर्टपीच बॉल टाकून मला आऊट करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट भारतीय संघाला त्याचा तोटाच होईल”, असं स्टीव्ह स्मिथने म्हटलंय.

ऑस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

(India Tour Australia Cheteshwar Pujara Challenge Australian Team)

संबंधित बातम्या

India tour Australia | ऑस्ट्रेलियन संघात निवड होताच युवा बोलर्सचं भारतीय फलंदाजांना आव्हान

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.