Virat Kohli : बस करो यार… विराट कोहलीमुळे ‘या’ खेळाडूचं जगणं झालं मुश्किल ? VIDEOमध्ये काय दिसतंय?

या क्रिकेटपटूचं आयपीएलमध्ये विराटसोबत चांगलंच वाजलं होतं. त्या भांडणामुळे तो अद्यापही नाराज आहे. त्याचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो कोहलीवर नाराज झाल्याचं दिसत आहे.काय आहे प्रकरण ?

Virat Kohli : बस करो यार… विराट कोहलीमुळे या खेळाडूचं जगणं झालं मुश्किल ? VIDEOमध्ये काय दिसतंय?
विराट कोहलीमुळे 'या' खेळाडूचं जगणं झालं मुश्किल?
Image Credit source: social media
| Updated on: Aug 29, 2024 | 1:13 PM

आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नवीन-उल-हक यांच्यात झालेला वाद खूपच गाजला, ते भांडण अजूनही बऱ्याच लोकांच्या लक्षात असेल. दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर कोहली आणि गंभीरमध्येही मोठं भांडण झालं होतं. या वादाला आता दोन वर्ष उलटून गेली असली तर अनेक चाहत्यांमध्ये याची चर्चा होत असते. त्यावेळी विराट कोहलीच्या चाहत्यांनी नवीन आणि गंभीर यांना प्रचंड ट्रोल केले होते. यानंतर कोहली आणि नवीन यांनी वाद मिटवला होता. मात्र नवीनच्या मागचा पिच्छा काही अद्याप सुटलेला नाही आणि तो पुन्हा एकदा त्रस्त झालाय. नवीन उल हकने आता विराट कोहली बाबतच्या एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवीनने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमुळे नवीन उल हक वैतागला आहे. ‘ बस करो यार अब तो कुछ नया ढूंढ़ लो.. ‘ असं म्हणत वैतागलेल्या नवीनने प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर नवीन सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला पोहोचला आहे आणि लीग सुरू होण्यापूर्वी बार्बाडोस रॉयल्सने विराटच्या माध्यमातून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

विराटमुळे का त्रासला नवीन ?

कॅरिबियन प्रीमियर लीग 2013 मध्ये सुरू झाली. त्याची 12वी आवृत्ती 30 ऑगस्टपासून सुरू होईल, ज्यामध्ये 6 संघ सहभागी होणार आहेत. नवीन-उल-हक यावेळी बार्बाडोस रॉयल्सकडून खेळणार आहे. लीग सुरू होण्याआधी फ्रँचायझीने त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. खरंतर, टीमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नवीन जिथे जिथे जातो तिथे आहे. त्याला विराटशी संबंधित गोष्टींची आठवण करून दिली जाते. फोनवर त्याला विराट कोहलीचे रील्स दिसतात,अगदी रूम सर्व्हिस वाले लोकही त्याला 18 नंबरचं चॅनेल बघण्याचा सल्ला देतात. हे सगळं पाहून नवीन कंटाळला असल्याचे दिसत आहे. या मजेशीर व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. वैतागून तो अखेर म्हणतो ‘ बस करो यार अब तो कुछ नया ढूंढ़ लो.. ‘

चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा लीगचा प्रचार करण्याचा चांगला प्रयत्न आहे, असे अनेक युजर्सनी म्हटलं.तर काहींनी विराट आणि नवीनच्या भांडणाचे फोटोही पोस्ट केले.

 

 

काय होता वाद ?

खरंतर, आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला होता. तेव्हा विराट कोहलीचा नवीन उल हक आणि नंतर गौतम गंभीरसोबत वाद झाला. आरसीबीच्या विजयानंतर कोहली जेव्हा नवीनशी हस्तांदोलन करायला गेला तेव्हा नवीन त्याच्याशी नीट वागला नाही. यानंतर लखनऊचा कर्णधार राहुलने नवीनला कोहलीची माफी मागण्यास सांगितलं, मात्र नवीनने कोहलीसमोरच राहुलला नकार दिला. या गदारोळानंतर कोहली आणि गंभीर यांच्यातही वाद झाला आणि त्या दोघांची 100 टक्के मॅच फी कापण्यात आली आणि नवीनला 50 टक्के मॅच फी गमवावी लागली.