AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salim Durani: सिक्सर किंग, क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांच्या पत्नीवर भीक मागण्याची वेळ? रेखा श्रीवास्तव निवारा गृहात, सत्य काय?

Cricketer Salim Durani: भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी अनेकदा मैदान गाजवले. त्यांचे काही रेकॉर्ड आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात गारुड घालतात. पण एका भीक मागणाऱ्या महिलेने त्यांची पत्नी असल्याचा दावा केल्याने सध्या चर्चा सुरू आहे.

Salim Durani: सिक्सर किंग, क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांच्या पत्नीवर भीक मागण्याची वेळ? रेखा श्रीवास्तव निवारा गृहात, सत्य काय?
क्रिकेटर सलीम दुर्राणी Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 18, 2025 | 11:41 AM
Share

Rekha Srivastava in a Shelter Home: मुंबईतील बेलापूर मेट्रो स्टेशनच्या बाहेर एका वृद्ध महिला भीक मागत असताना दिसली. काही जणांनी तिला निवारा केंद्रात आणले. जेव्हा तिने तिची आपबित्ती सांगितली, तेव्हा सर्वच जण अवाक झाले. या महिलेला निवारागृहात अंघोळ घालण्यात आली. तिला नवीन कपडे देण्यात आले. त्यानंतर तिचे नाव आणि तिच्या पतीचे नाव विचारण्यात आले. तेव्हा अनेकांना धक्का बसला. या महिलेचे नाव रेखा श्रीवास्तव असे आहे आणि तिने माजी क्रिकेटर सलीम दुर्राणी यांची पत्नी असल्याचा दावा केला.

महिलेच्या दाव्यानुसार, तिचा अर्ध्याहून अधिक काळ हा मुंबईतच गेला आहे. ती काही वर्ष दुबईतही राहिली. ती एका विमान कंपनीची मालक होती. तिचे लग्न क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांच्याशी झाले होते. दुर्राणी यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्या रस्त्यावर आल्या. काय आहे त्यामागील सत्य?

सलीम दुर्राणी हे माझे पती

रेखा श्रीवास्तव यांनी दावा केला आहे की प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग सलीम दुर्राणी यांच्याशी तिचे लग्न झालेले आहे. ती त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी फिरायला गेली. त्यांच्या प्रत्येक सामन्यावेळी ती हजर होती. तिने त्यावेळी अनेक राजा-महाराजांच्या भेटी घेतल्या आहेत. गुजरातच्या महाराजांशी आपण भेटल्याची माहिती तिने दिली.

दुबईतही काही दिवस

रेखा श्रीवास्तवच्या दाव्यानुसार, ती दुबईतही सलीम दुर्राणी यांच्यासोबत राहत होती. तिने चांगले आयुष्य जगले. सुख आणि श्रीमंती तिच्या पायाशी लोळण घेत होते. ती एका विमान कंपनीची सहमालकही होती. पण आयुष्यात एकदम दुर्दैवी घटना घडली आणि तिचे आयुष्य पालटले. ती आर्थिकदृष्ट्या बरबाद झाली. ती बेघर झाली. तिला बंगला विकावा लागला.

सलीम दुर्राणी यांचे कुटुंबिय सध्या जामनगर येथे राहतात. त्यांच्याकडून या महिलेसंबंधीची कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांनी या महिलेला ओळखत असल्याचा कोणताही दावा केलेला नाही. काहींच्या मते रेखा श्रीवास्तव यांचे नाव सलीम दुर्राणी यांच्याशी संबंधित घडामोडीत आढळत नाहीत. सलीम दुर्राणी यांचे 2 एप्रिल 2023 रोजी निधन झाले. त्यावेळी ते जामनगर येथे त्यांच्या भावासोबत राहत होते.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी