Palash Muchhal and Smriti Mandhana: स्मृती मानधनासोबतचे लग्न मोडले, पलाश मुच्छल याचे मोठे पाऊल, सर्वच जण हैराण
Palash and Smriti: क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे नाते संपुष्टात आले आहे. लग्न मोडल्याचे स्मृतीने रविवारी स्पष्ट केले होते. दोघांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत आता वेगळ्या मार्गाने जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान या घडामोडीनंतर पलाश मुच्छलने मोठे पाऊल टाकले आहे. त्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत.

Palash Muchhal and Smriti Mandhana: बॉलिवूड संगितकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार क्रिकेटर, उपकर्णधार स्मृती मानधना यांचे नाते तुटले. स्मृतीने रविवारी लग्न मोडल्याचे आणि आपआपल्या मार्गाने जाण्याचे जाहीर केले. ज्या दिवशी दोघांचे लग्न होणार होते. त्याच दिवशी स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर एकच काहूर उठले होते. दोन दिवसांपूर्वी स्मृती आणि पलाशने गेल्या 6 वर्षांपासून सुरु असलेल्या नात्यातून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
गेल्या 6 वर्षांपासून सुरु असलेले नाते संपुष्टात आल्याची माहिती स्मृती आणि पलाशने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली. तर यादरम्यान पलाशने मोठे पाऊल टाकले आहे. त्यामुळे सर्वच जण हैराण झाले आहे. आता पलाशने या नात्याची अखेरची आठवण, इन्स्टाग्रामवरील स्मृती मानधना हिला प्रपोज करतानाचा व्हिडिओ पण डिलीट केला आहे. त्यामुळे आता दोघांनी या भावनिक नात्याला तिलांजली दिल्याचे समोर आले आहे.
प्रपोज करतानाचा व्हिडिओ हटवला
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या दिवशी अचानक लग्न पुढे ढकलण्यात आले. तर आता दोघांनी हे नाते संपुष्टात आल्याचे सोशल मीडियावरुन जाहीर केले. पण दोघांनी हे लग्न का मोडले याचं कारण मात्र गुलदस्त्यात ठेवले. दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले. स्मृती मानधना हिने इन्स्टा खात्यावरील पलाश याच्यासोबतचे सर्व पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आहे. पण या सर्व घटनेनंतर पलाश मुच्छलने स्मृती मानधना हिला प्रपोज करतानाचा व्हिडिओ डिलीट केलेला नव्हता. पण आता हा व्हिडिओ सुद्धा त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून हटवले आहे. त्याने हा व्हिडिओ डिलीट केला आहे.
का रद्द झाले लग्न?
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे नाते बहरत गेले. या दोघांचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर दिसत होते. 6 वर्षांपासून दोघेही नात्यात असल्याचे समजते. आता या नात्याला दोघांनी अधिकृत ओळख देण्याचा निश्चिय केला. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली येथील स्मृती मानधनाच्या फार्म हाऊसवर लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली. विधी सुरू झाले आणि अचानक हे लग्न नाट्यमय वळणावर आले. स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडली. लग्न पुढे ढकलले तर दोन दिवसांपूर्वी 7 डिसेंबर रोजी स्मृतीने एक पोस्ट करत लग्न मोडल्याचे जाहीर केले. पण हे लग्न का मोडले याचे कारण दोघांनीही दिले नाही. त्यांनी इतका मोठा निर्णय कोणत्या कारणामुळे घेतला याची माहिती दिली नाही.
