
मार्टिन गुप्टिलची गणना जगातील वादळी आणि आक्रमक फलंदाजांमध्ये केली जाते. तो न्यूझीलंड क्रिकेट संघाचा एक अनुभवी आणि महत्वाचा सदस्य आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत बरेच विक्रम केले. याच बॅट्समन क्रिकेटरची पत्नी ऑलराऊंडर आहे. गप्टिलची पत्नी स्पोर्ट्स अँकर आहे. तिचं नाव लॉरा मॅकगोल्डरिक असून ती एक रेडिओ होस्ट, न्यूज प्रेंझेटर आणि अभिनेत्री देखील आहे.

लॉराचं क्रिकेटशी जुनं नातं आहे. तिच्या कुटुंबात तिचे भाऊ घराच्या अंगणात क्रिकेट खेळायचे. तेव्हापासून तिला क्रिकेट पाहण्याची सवय आहे, पण तिचे स्वप्न अभिनेत्री होण्याचं होतं. म्हणूनच तिने आर्ट्सचा अभ्यास केला. तिच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच 2006 ते 2010 या काळात तिने बऱ्याच नाटकांत काम केलं किंबहुना थिएटरला प्राधान्य दिलं.

यानंतर तिने टेलिव्हिजन जगात होस्ट म्हणून काम करण्यास सुरवात केली. 2011 मध्ये स्काय टेलिव्हिजनवर 'द क्रिकेट शो' होस्ट करण्याची संधी तिला मिळाली. इथूनच तिला अधिक लोकप्रियता मिळाली. पण तिचं मन नेहमीच अभिनयात गुंतलेलं असायचं2014 मध्ये जेव्हा तिला 'वेस्टसाइड' या ड्रामा सिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

'द क्रिकेट शो' वर लॉराने गुप्टिलची भेट घेतली. या शोवर त्याने गुप्टिलची मुलाखत घेतली. त्यानंतर या दोघांमध्ये डेटिंगची प्रक्रिया सुरू झाली. 4 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे आणि सध्या लॉरा गर्भवती आहे.

लग्नानंतर तिने अनेकदा आपल्या पतीच्या मुलाखतही घेतल्या आहेत. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात नेपियरमध्ये गप्टिलने नाबाद 117 धावा केल्या आणि सामनावीर ठरला. सामन्यानंतर गप्टिलची मुलाखत त्याच्चा पत्नीने घेतली. विशेष म्हणजे ही मुलाखत व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 रोजी घेतली होती.