T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

| Updated on: Sep 20, 2022 | 8:25 AM

काइल जैमीसन, टॉड एस्टल आणि टिम सेफर्ट यांना पंधरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही.

T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी
new zealand
Image Credit source: twitter
Follow us on

T20 विश्वचषकाची (T20 World Cup) चर्चा मागच्या काही दिवसांपासून जोरदार सुरु आहे. त्याचबरोबर देशातल्या सोळा टीममधला संघर्ष पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात (Australia) पाहायला मिळणार आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर आत्तापासून अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. भारत पाकिस्तान आणि श्रीलंका (Shrilanka) देशाने आपल्या खेळाडूंची यादी दिल्यानंतर अधिक चर्चा झाली होती. कारण आशिया चषकात ज्यांनी खराब कामगिरी केली त्यांना संधी दिल्याने ही टीका झाली होती.

न्यूझीलंडकडून 15 खेळाडूंची यादी जाहीर कऱण्यास विलंब झाला होता. त्यामुळे ती सुद्धा सोशल मीडियावर चर्चा होती. परंतु न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून विलंब झाल्याचं कळवलं होतं. तसेच पुढील तारीख मागून घेतली होती.

न्यूझीलंडकडून 15 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन खेळाडूंना डावलण्यात आले आहे. T20 विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडू्ंना संधी देण्यात आली आहे. लॉकी फर्ग्यूसन, माइकल ब्रेसवेल आणि फिन एलेन, ट्रेंट बोल्ट, जिमी नीशम, यांना संधी मिळाली आहे.

काइल जैमीसन, टॉड एस्टल आणि टिम सेफर्ट यांना पंधरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही.

न्यूझीलंडचा विश्वचषक संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, इश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गप्टिल, लचलान फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट , फिन ऍलन