IND vs NZ: भारतीय संघाने जगासमोर किवीची लाज काढली, पण तरीही न्यूझीलंडच्या कर्णधाराला स्वत:च्या टीमचं कौतुक

IND vs NZ 3rd T30 Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून तिसरा सामना भारतीय संघाने जिंकला. आता यानंतर किवी कर्णधार मिचेल सँटनरने एक विधान केले आहे.

IND vs NZ: भारतीय संघाने जगासमोर किवीची लाज काढली, पण तरीही न्यूझीलंडच्या कर्णधाराला स्वत:च्या टीमचं कौतुक
| Updated on: Oct 28, 2026 | 7:35 AM

IND vs NZ 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी-२० सामना काल पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाचा विजय झाल्यामुळे आता मालिकेत ३-० ने पुढे आहे. भारतीय संघाची कालची कामगिरी पाहून फक्त किवी गोलंदाज दंग झाले नाहीत तर सर्वच अवाक झाले. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीने मैदानात थैमान घातला. किवी गोलंदाजांच्या पराभवानंतर आता कर्णधार मिचेल सँटनरने एक विधान केले आहे आता त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सामन्यानंतर मिचेल सँटनर म्हणाला की, “भारतीय फलंदाजांच्या आक्रमक फलंदाजीला रोखणे गोलंदाजांसाठी कठीण होते. एकदा हे खेळाडू लयीत आले की त्यांना रोखणे खूप कठीण असते. हे आपण यापूर्वी आयपीएलमध्ये आणि आज रात्री न्यूझीलंडमध्येही पाहिले आहे. न्यूझीलंडला टीम इंडियाच्या आक्रमक फलंदाजीवर तोडगा काढावा लागेल. भारतीय फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये ज्या प्रकारे धावा केल्या, त्यामुळे सामन्याचे चित्रच पालटले. आता, न्यूझीलंड संघाला पुढील सामन्यापूर्वी आपल्या गोलंदाजीच्या रणनीतीवर पुनर्विचार करावा लागेल. मी पहिल्या डावात अक्षर पटेल कसा फलंदाजी करत होता हे पाहिले. त्यामुळे दोन्ही डावखुरे फलंदाज चांगल्या लयीत असल्यामुळे मी स्वतःला फलंदाजीसाठी पाठवले नाही. भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचा मार्ग मी नक्कीच शोधेल.”

Loading...

पराभव होऊनही, सँटनरने आपल्या संघाच्या फलंदाजीतील सकारात्मक बाबींवरही प्रकाश टाकला. तो म्हणाला की,”फलंदाज चांगली खेळी करत आहेत आणि काही जण चांगली सुरुवात करून मोठी धावसंख्या उभारत आहेत.  ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेलसारख्या खेळाडूंच्या योगदानाने संघाला आत्मविश्वास दिला आहे की, वेगवेगळे खेळाडू फलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात. न्यूझीलंड एके वेळी सुमारे २०० धावांपर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत होता. अशा खेळपट्टीवर २०० धावा ही एक चांगली धावसंख्या ठरली असती, परंतु भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट यॉर्कर टाकून धावा करण्याच्या संधी मर्यादित केल्या.”

सँटनरने न्यूझीलंडच्या डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला की, “भारतीय गोलंदाजांनी अचूक यॉर्कर टाकून न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा करणे कठीण केले.भागीदारीच्या जोरावर आमच्या संघाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये जोरदार पुनरागमन केले. सँटनरने पुढील सामन्याबद्दल चिंताही व्यक्त केली. टीम इंडियाच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्यासाठी न्यूझीलंडला नवीन रणनीती विकसित करावी लागेल. ईडन पार्कवर होणारा पुढील सामना विशेषतः आव्हानात्मक असू शकतो, कारण तेथील सीमा तुलनेने लहान असू शकतात.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us