Novak Djokovic इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकला?, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला हुलकावणी, डॅनिल मेदवेदेव विजयी

जगातील नंबर 1 चा टेनिसपटू असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचला अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागाल आहे. रशियाच्या डेनिल मेदवेदेवने त्याला मात दिली.

Novak Djokovic इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकला?, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला हुलकावणी, डॅनिल मेदवेदेव विजयी
नोव्हाक जोकोव्हिच
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 11:32 AM

US open 2021: एक विजय आणि अनेक अप्रतिम विक्रम नावावर करण्यापासून सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच (Novak Djokovic) थोडक्यात हुकला. टेनिस विश्वातील मानाची स्पर्धा असणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धत पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये नोव्हाकला रशियाचा डॅनिल मेदवेदेव (daniil medvedev) यांने पराभूत केलं. यंदाच्या वर्षात नोव्हाकने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा तीनही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकत इतिहास रचला होता. पण ही आणखी एक स्पर्धा न जिंकल्याने दोन विक्रमांपासून तो दूर राहिला आहे.

नोव्हाकसाठी आजचं ग्रँडस्लॅम हे 21 वं ग्रँडस्लॅम ठरलं असतं. आतापर्यंत राफेल नदाल आणि रॉडर फेडरर या दिग्गजांसह नोव्हाकनेही 20 ग्रँडस्लॅम पटकावले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा जिंकून नोव्हाक 21 ग्रँडस्लॅम खिशात घालून दिग्गद नदाल आणि फेडररला मात देऊ शकला असता.

असा झाला सामना

नोव्हाक आणि डॅनिल यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा आणि उत्कठांवर्धक झाला. फायनलमध्ये नोव्हाकला सरळ तीन सेट्समध्ये पराभव मिळाला असला तरी त्याने संपूर्ण सामन्यात आपल्या नावलौकीकाप्रमाणे कडवी झुंज दिली. डॅनिल आणि नोव्हाक यांच्यातील सामना तब्बल 2 तास 16 मिनिटे चालू होता. यामध्ये डॅनिलने नोव्हाकला 6-4, 6-4 आणि 6-4 अशा थेट फरकाने पराभूत केलं.

कॅलेंडर स्लॅम हुकलं

आजच्या विजयासोबतच नोव्हाकच्या नावावर ‘कॅलेंडर स्लॅम’ हा विक्रमही झाला असता. यंदा नोव्हाकने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा तीनही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्यामुळे अमेरिकन ओपन जिंकला असता तर तो एका वर्षात इतक्या स्पर्धा जिंकणारा मागील बराच वर्षातील पहिलाच खेळाडू ठरला असता. याआधी तब्बल 52 वर्षांपूर्वी म्हणजेच 1969 मध्ये रॉड लेव्हर याने ही कामगिरी केली होती.

इतर बातम्या

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर

PHOTO : चेन्नई सुपरकिंग्सचा संघ उर्वरीत IPL मध्ये सर्वात घातक?, ‘या’ पाच खेळाडूंनी स्पर्धेआधीच दाखवला जलवा

(Daniil medvedev beat novak djokovic in US open Final and won his 1st grand slam where Novak got frustrated)