AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर

इसीबीला पाचवी कसोटी रद्द झाल्यानं प्रक्षेपणातून मिळणाऱ्या 300 कोटींचं तर तिकिट विक्रीतून होणाऱ्या 100 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर
सौरव गांगुली
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 3:35 PM
Share

नवी दिल्ली: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी कोरोना संसर्गामुळं रद्द करण्यात आली आहे. पाचवी कसोटी केव्हा खेळवली जाईल यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, पाचवी कसोटी रद्द झाल्यानं इंग्लंड क्रिकेट बोर्डाला 4 अब्ज म्हणजेच 400 कोटींचं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली खासगी दौऱ्याच्या निमित्तानं इंग्लंडला जाणार आहे. गांगुली 22 किंवा 23 सप्टेंबरला इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंग्लंड दौऱ्यावर सौरव गांगुली इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्याकारी अधिकारी टॉम हॅरिसन आणि इयान वाटमोर यांची भेट घेणार आहे. या भेटीत कसोटी कधी आयोजित करायची यासंदर्भात चर्चा होण्याची शक्ता आहे. पाचवी कसोटी रद्द झाल्यानं इसीबीला होणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या नुकसानावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

इसीबीला 400 कोटींचं नुकसान

इसीबीला पाचवी कसोटी रद्द झाल्यानं प्रक्षेपणातून मिळणाऱ्या 300 कोटींचं तर तिकिट विक्रीतून होणाऱ्या 100 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. हॅरिसन यांनी स्काय स्पोर्टसशी बोलताना आता परिस्थिती बदलली असल्याचं सांगितलं आहे. आम्ही विविध पर्यायावर विचार करत असल्याचं हॅरिसन यांनी सांगितलं आहे.

पुढील वर्षी जुलै महिन्यात कसोटी मॅच होण्याची शक्यता

पुढील वर्षी टीम इंडिया मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी ही कसोटी खेळवली जाईल, अशा चर्चा आहेत. मात्र, तोपर्यंत बऱ्याच गोष्टी बदललेल्या असणार आहेत. इंग्लंडची टीम मजबूत होणार असल्यानं भारतानं मालिका विजयाची संधी गमावल्याचं बोललं जात आहे.

टीम इंडिया भन्नाट फार्मात

विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियानं इंग्लंडविरोधातील मालिकेत शानदार कामगिरी केली होती. टीम इंडियानं पहिल्या चार कसोटीमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली होती. तर, पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयाच्या जवळ पोहोचली होती. मात्र, पावसामुळे पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफला कोरोना संसर्ग झाल्यानं टीम इंडियाचा मालिका विजय लांबणीवर पडला आहे.

रवी शास्त्रींना कोरोना रवी शास्त्रींना कोरोनाची लागण झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम आणखी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात होती. अखेर पाचवी कसोटी रद्द करण्यात आली. दरम्यान बीसीसीआय़ आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपआपसांत चर्चा करुन ही कसोटी भविष्यात घेऊ शकतात अशीही चर्चा आहे. पुढील वर्षी भारत पुन्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे त्यावेळी हा सामना होऊ शकतो.

इतर बातम्या:

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, टीम इंडियानं मालिका विजयाची संधी गमावली? इंग्लंडला ‘असा’ होणार फायदा

T20 world Cup 2021 साठी भारतापासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्वांचे संघ जाहीर, पाहा कोणते खेळाडू खेळणार एका क्लिकवर

ind vs eng BCCI Persident Sourav Ganguly to meet ecb ceo during personal visit to england this month after manchester test match ecb lost 400 Cr rupees

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.