AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, टीम इंडियानं मालिका विजयाची संधी गमावली? इंग्लंडला ‘असा’ होणार फायदा

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी कोरोना संसर्गामुळं रद्द करण्यात आली आहे. टीम इंडियानं यामुळे मालिका विजयाची संधी गमावलीय का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पाचवी कसोटी केव्हा खेळवली जाईल यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही.

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, टीम इंडियानं मालिका विजयाची संधी गमावली? इंग्लंडला 'असा' होणार फायदा
भारतीय संघ
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 3:12 PM
Share

नवी दिल्ली: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी कोरोना संसर्गामुळं रद्द करण्यात आली आहे. टीम इंडियानं यामुळे मालिका विजयाची संधी गमावलीय का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पाचवी कसोटी केव्हा खेळवली जाईल यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या टीम इंडिया फॉर्मात असल्यानं कसोटी मालिका जिंकण्याची संधी निर्माण झाली होती, असं म्हटलं जातयं. पुढील वर्षी टीम इंडिया मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी ही कसोटी खेळवली जाईल, अशा चर्चा आहेत. मात्र, तोपर्यंत बऱ्याच गोष्टी बदललेल्या असणार आहेत. इंग्लंडची टीम मजबूत होणार असल्यानं भारतानं मालिका विजयाची संधी गमावल्याचं बोललं जात आहे.

इंग्लंडच्या टीममध्ये त्रिकुटाची एंट्री होणार

पाचवी कसोटी ज्यावेळी होईल त्यावेळी इंग्लंडची टीम आणखी मजबूत झालेली असेल. इंग्लंडच्या टीममध्ये बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड हे त्रिकुट त्यावेशी सामिल झालेलं असेल. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन आणखी वाढणार आहे. सध्याच्या मालिकेत बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर टीममध्ये सहभागी नव्हते मात्र, स्टुअर्ट ब्रॉडनं पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजी केली होती. मात्र, त्याला चांगलं प्रदर्शन करता आलं नव्हतं. दुसऱ्या कसोटीपूर्वी सराव करताना स्टुअर्ट ब्रॉड जखमी झाले होते.

जोफ्रा आर्चर दुखापतीमुळं गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. टी-20 वर्ल्ड कप आणि अ‌ॅशेस मालिकेत देखील तो खेळू शकणार नाही. इंग्लंडच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी तो टीममध्ये सहभागी होईल. बेन स्टोक्स देखील बोटाला झालेल्या दुखापतीमुळे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. हे तिन्ही खेळाडू भारताविरोधातील पाचव्या कसोटीत सहभागी झाल्यास इंग्लंडला पलटवार करु शकते, त्यामुळे मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटू शकते.

टीम इंडिया भन्नाट फार्मात

विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियानं इंग्लंडविरोधातील मालिकेत शानदार कामगिरी केली होती. टीम इंडियानं पहिल्या चार कसोटीमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली होती. तर, पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयाच्या जवळ पोहोचली होती. मात्र, पावसामुळे पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफला कोरोना संसर्ग झाल्यानं टीम इंडियाचा मालिका विजय लांबणीवर पडला आहे.

रवी शास्त्रींना कोरोना

रवी शास्त्रींना कोरोनाची लागण झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम आणखी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात होती. अखेर पाचवी कसोटी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान बीसीसीआय़ आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपआपसांत चर्चा करुन ही कसोटी भविष्यात घेऊ शकतात अशीही चर्चा आहे. पुढील वर्षी भारत पुन्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे त्यावेळी हा सामना होऊ शकतो.

इतर बातम्या:

India vs England 5th Test : पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचा घाला, दोन्ही बोर्डांच्या सहमतीने सामना रद्द!

वयाच्या 19 व्या वर्षी विश्वचषक जिंकला, 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकलं, पण भारतीय संघात राहिला मागे, टी-20 संघातही नाव नाही

ind vs eng manchester test match cancelled due to corona virus experts said team India lost chances victory of test series

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.