वयाच्या 19 व्या वर्षी विश्वचषक जिंकला, 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकलं, पण भारतीय संघात राहिला मागे, टी-20 संघातही नाव नाही

एकेकाळी आयपीएल गाजवल्यानंतर आता खराब स्ट्राईक रेट आणि घसरता फॉर्म यामुळे या खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळेणासे झाले आहे. टी-20 विश्वचषकासाठीच्या संघातही त्याला स्थान मिळालेले नाही.

वयाच्या 19 व्या वर्षी विश्वचषक जिंकला, 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकलं, पण भारतीय संघात राहिला मागे, टी-20 संघातही नाव नाही
मनिष पांडे

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील एक सर्वात फिट आणि स्टायलिश खेळाडू म्हटलं तर  मनीष पांडे (Manish Pandey) हे नाव सर्वांनाच आठवतं. अवघ्या 19 व्या वर्षी विश्वचषक त्यानंतर 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकणारा मनीष आता मात्र हळू हळू भारतीय संघातून दूर होत आहे. एकाही मोठ्या स्पर्धेत स्थान न मिळालेल्या मनीषने नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही सर्वांना निराश केलं. ज्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकाच्या संघात त्याला स्थान मिळालेलं नाही. आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी मनीषचा वाढदिवस आहे.

मनीष पांडेचा जन्म 10 सप्टेंबर, 1989 रोजी कुमाऊं जिल्ह्यातील बागेश्वर या ठिकाणी झाला होता. पण तो 15 वर्षांचा असतानाच त्याच कुटुंब बंगळुरुला शिफ्ट झालं. त्याचे वडील इंडियन आर्मीमध्ये होते. मनीषने केंद्रीय विद्यालयात शिक्षण पूर्ण करत पुढे जाऊन कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनमधून खेळू लागला. इथून सुरु झालेल्या मनीषच्या क्रिकेट कारकिर्दीत 2008 साली मोठी गोष्ट घडली. विराटच्या नेतृत्त्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्या संघात महत्त्वाची कामगिरी मनीषनेही बजावली होती.

IPL मध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय

2008 वर्ष मनीष पांडेसाठी फार लकी ठरलं. एकीकडे विश्वचषक जिंकताच IPL मध्येही त्याला मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतलं. त्यानंतर 2009 साली त्याने आरसीबी विरुद्ध खेळताना दमदार शतक ठोकलं. हे त्याचं पहिलचं आयपीएल शतक असून तो आयपीएल शतक ठोकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. 2014 मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्स संघात होता. त्याने संघाला ट्रॉफी जिंकवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली फायनलमध्ये त्याने 94 धावा ठोकल्या होत्या.

भारतीय संघात पदार्पण

मनीष पांडेने 2015 मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध वनडे संघात पदार्पण केले. त्याने सलामीच्या सामन्यातच केदार जाधवसोबत मिळून 144 धावांची भागिदारी रचली. त्याच दौऱ्यात त्याचा T-20 संघातही समावेश करण्यात आला. 2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने सिडनीमधील एकदिवसीय सामन्यात 104 धावांची उत्कृष्ट इनिंग खेळली. 2016 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये आणि 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही तो 15 सदस्यीय संघात होता.  पण अलीकडे त्याचा घसरता स्ट्राईक रेट आणि उतरता फॉर्म यामुळे त्याला हैद्राबाद संघातून खेळताना चांगली कामगिरी करता येत नाही. त्यामुळेच त्याला टी-20 विश्वचषकाच्या संघातही स्थान मिळालेलं नाही.

इतर बातम्या

Ind vs Eng : गणपती बाप्पा पावला, भारताच्या सर्व खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, आजपासून पाचव्या कसोटीचा थरार

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती

T20 world Cup 2021: टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन दिग्गज खेळाडूंना डच्चू

(Indian cricketer manish pandey birthday today hes didnt get chance in t20 squad for world cup)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI