T20 world Cup 2021: टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन दिग्गज खेळाडूंना डच्चू

आगामी टी-20 विश्वचषकासाठी सर्व देश आपआपले संघ जाहीर करत असताना दक्षिण आफ्रिकेने देखील आपले शिलेदार सर्वांसमोर आणले आहेत. यावेळी दोन दिग्गज खेळीडूंना मात्र संघात स्थान दिलेले नाही.

T20 world Cup 2021: टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन दिग्गज खेळाडूंना डच्चू
दक्षिण आफ्रिका संघ
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 7:01 PM

लंडन : टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळवला जाणार असून सर्व संघानी जवळपास आपआपले अंतिम 15 खेळाडू आणि 3 राखीव खेळाडू जाहीर केले आहेत. नुकतंच दक्षिण आफ्रिका संघाने देखील आपले शिलेदार सर्वांसमोर आणले आहेत. विशेष म्हणजे आयपीएल गाजवणारे काही खेळाडू यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम संघात नसल्याने एका मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे. यामध्ये ख्रिस मॉरिस (Chris Morris), इम्रान ताहीर (Imran Tahri) आणि फाफ डु प्लेसी (Faf Du Plesis).

मॉरिस यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू असून त्याला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटींना खरेदी केलं आहे.  पण त्याचा देश दक्षिण आफ्रिकेने मात्र त्याला संघात स्थान दिलेले नाही. तर दुसरीकडे नुकतच कसोटी क्रिकेटला निरोप दिलेल्या डुप्लेसीला देखील संघात स्थान मिळालेले नाही. डुप्लेसीने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या पहिल्या पर्वात सलामीला येत उत्तम फलंदाजी केली होती. या दोघांसह लेग स्पिनर इमरान ताहिरलाही संघात जागा मिळालेली नाही. यावेळी टेम्बा बावुमाला कर्णधारपद मिळालं आहे.

फलंदाजीची जबाबदारी डी कॉकवर 

संघामध्ये एक अनुभवी आणि उतकृष्ट फलंदा म्हणजे क्विंंटन डी कॉक. डी कॉकवर सर्व फलंदाजीची महत्त्वाची जबाबदारी असेल. डीकॉकसह हेनरिक क्लासेन याच्यावरही फलंदाजीची मदार असेल. तर गोलंदाजीमध्ये रबाडा आणि निगडी मुख्य गोलंदाज असून केशव महाराज, तबरेज शम्सी आणि फॉर्टयूइन या फिरकीपटूंवरही गोलंदाजीची धुरा असेल.

टी- 20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ :  

टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंंटन डी कॉक (यष्टीरक्षक), बजोर्न फॉर्टयूइन,रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडिन मार्कराम, डेविड मिलर, डब्ल्यू मुल्डर, लुंगी निगजी, एनरिख नॉर्खिया, ड्वायन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वान डर डुसेन.

राखीव : जॉर्जी लिंडे, आंदिले फेहुलक्वायो, लिजाड विलियम्स.

हे ही वाचा :

 T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

T20 world Cup 2021: भारतीय संघाची घोषणा होताच इंग्लंडचा संघही जाहीर, बेन स्टोक्स नाहीच, पण तीन वर्षानंतर ‘या’ धाकड खेळाडूचे पुनरागमन

(South africa announced team for t20 world Cup 2021 chris morris and faf du plesis not in team)

Non Stop LIVE Update
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.