AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती

बीसीसीआयने बुधवारी रात्री टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये 15 सदस्यीय संघाबरोबर आणखी एक मोठी घोषणा होती, ती म्हणजे एमएस धोनी भारतीय टी ट्वेन्टी संघाचा मेन्टॉर असेल.

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती
धोनी आणि शास्त्री
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 6:15 PM
Share

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंतिम 15 खेळाडूंसह 3 राखीव खेळाडूंची नावं जाहीर केली. या सर्वांसोबत एक अत्यंत महत्त्वाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हा विश्व चषकासाठी खेळणाऱ्या संघाचा मेन्टॉर अर्थात मार्गदर्शक असणार आहे. दरम्यान या नव्या पदानंतर आता मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि मेन्टॉर धोनी यांच्यात संघ व्यवस्थापन किंवा सामन्याच्या तयारीदरम्यान वाद झाला तर? अशी भिती माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे.

गावस्कर यांनी आज तक या वृत्तसंस्थेशी बोलत असताना धोनीच्या मेन्टॉर होण्याबाबत आनंद असल्याचे सांगतानाच फक्त धोनी आणि शास्त्री यांच्यात वाद होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी स्वत:बरोबर घडलेल्या एका अनुभवाबद्दल यावेळी सांगितले. 2004 साली  जॉन राईट भारताचे मुख्य प्रशिक्षक असताना गावस्कर यांना मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं होतं. त्यावेळी जॉन यांना गावस्कर आपली जागा घेतील असं वाटल्याच गावस्कर म्हणाले. पण धोनी आणि शास्त्रींबद्दल बोलताना ते म्हणाले, ”धोनीला मुळात कोचिंगमध्ये अधिक रस नसून तो रणनीती बनवण्यात हुशार आहे. त्यामुळे शास्त्री आणि धोनीची जोडी जमली तर भारतीय संघाला खूप फायदा होईल हे नक्की. फक्त दोघांमध्ये कोणताच वाद होऊ नये एवढीत अपेक्षा आहे.”

धोनीची मेन्टॉरशीप वादाच्या भोवऱ्यात

महेंद्र सिंह धोनीला भारतीय संघाचता मेन्टॉर म्हणून नेमताच त्याच्याविरुद्ध एक तक्रार दाखल झाली आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेला धोनीला संघाचा मार्गदर्शक (मेन्टॉर) म्हणून नेमण्यात आल्याहबद्दल तक्रार दाखल केली आहे. एकाच वेळी कोणीही व्यक्ती दोन महत्त्वाची पदं भूषवु शकत नाही असे सांगत मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे माजी आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी ही तक्रार नोंदवली आहे. धोनी सध्या आयपीएल संघ चेन्नई सुपरकिंगचा कर्णधार असताना तो भारतीय संघाचा मेन्टॉर कसा होऊ शकतो? असा सवाल करत गुप्ता यांनी तक्रार केली आहे.

यावर बीसीसीआयच्या एका सूत्राने माहिती दिली की, ‘हो, गुप्ता यांनी अशाप्रकारती तक्रार केली आहे. यामध्ये बीसीसीआयच्या संविधानातील नियम 38 (4) चा संदर्भ देत ए व्यक्ती एका वेळी दोन पदांवर काम करु शकत नसल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा :

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

(Ms Dhoni will be team indian mentor for t20 world cup is good news but what if Dhoni and coach shashtri clashes says sunil gavaskar)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.