Deaflympics 2022 : धनुष श्रीकांतनं जिंकलं सुवर्णपदक, शौर्य सैनीकडून कांस्यपदकाची कमाई

| Updated on: May 05, 2022 | 2:00 PM

या ऐतिहासिक विजयासाठी माजी ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगने धनुष आणि शौर्याला सलाम केला आहे.

Deaflympics 2022 : धनुष श्रीकांतनं जिंकलं सुवर्णपदक, शौर्य सैनीकडून कांस्यपदकाची कमाई
धनुष श्रीकांतनं जिंकलं सुवर्णपदक, शौर्य सैनीकडून कांस्यपदकाची कमाई
Image Credit source: social
Follow us on

दिल्ली : ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या 24व्या डेफलिम्पिकमध्ये (Deaflympics) भारताला मोठं यश आलंय. या स्पर्धत धनुष श्रीकांतनं (Dhanush Srikanth) 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकलंय. त्याच्यासह शौर्य सैनीनेही (Shourya Saini) या स्पर्धेत कांस्यपदकावर निशाणा साधलाय. कर्णबधिर ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत आठ खेळाडूंमध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये धनुषने 247.5 च्या विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियाच्या किम वूने 246.6 गुणांसह दुसरे, तर भारताच्या शौर्य सैनीने 224.3 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. या ऐतिहासिक विजयासाठी माजी ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगने धनुष आणि शौर्याला सलाम केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘जेव्हा दोन भारताचे झेंडे व्यासपीठावर एकत्र फडकत असतील, तेव्हा यापेक्षा चांगले फिलिंग काहीही असू शकत नाही. धनुष आणि शौर्याने तुमचा संपूर्ण भारताला अभिमान वाटला. तुमच्या उत्साहाला, जिद्दीला आणि मेहनतीला सलाम.’ असं ट्विट माजी ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग यांनी केलंय.

गगन नारंग यांचे ट्विट

बॅडमिंटनमध्येही सुवर्णपदक

बॅडमिंटनमध्येही सुवर्णपदक मिळाले आहे. या कर्णबधिर ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटन सांघिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळाले आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत जपानचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. सध्या भारतीय संघ दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदकांसह पदकतालिकेत आठव्या स्थानावर आहे. येथे युक्रेन 19 सुवर्ण, 6 रौप्य आणि 13 कांस्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

आठ खेळाडूंमध्ये अंतिम सामना

कर्णबधिर ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत आठ खेळाडूंमध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये धनुषने 247.5 च्या विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियाच्या किम वूने 246.6 गुणांसह दुसरे, तर भारताच्या शौर्य सैनीने 224.3 गुणांसह तिसरे स्थान पटकावले, या ऐतिहासिक विजयासाठी माजी ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगने धनुष आणि शौर्याला सलाम केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘जेव्हा दोन भारताचे झेंडे व्यासपीठावर एकत्र फडकत असतील, तेव्हा यापेक्षा चांगले फिलिंग काहीही असू शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय.