Fifa World Cup 2026 : फुटबॉल वर्ल्डकपचं बिगुल वाजलं! स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी टीम इंडियाचा पहिला सामना आज कुवैतशी

| Updated on: Nov 16, 2023 | 4:36 PM

Fifa World Cup 2026 : वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे फिफा वर्ल्डकप 2026 साठी पात्रता फेरी सुरु झाली आहे. पात्रता फेरीच्या दुसरा टप्पा गुरुवारपासून सुरु होणार आहे. भारताचा सामना कुवैतशी होणार आहे. भारताच्या ग्रुपमध्ये कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान आहेत. या ग्रुपमधील टॉप दोन संघ तिसऱ्या फेरीत स्थान मिळवणार आहेत.

Fifa World Cup 2026 : फुटबॉल वर्ल्डकपचं बिगुल वाजलं! स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी टीम इंडियाचा पहिला सामना आज कुवैतशी
FiFa World Cup 2026 : फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया करणार एन्ट्री! पण कसं आणि पात्रता फेरीबाबत जाणून घ्या
Follow us on

मुंबई : फिफा अर्थात फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठीचं बिगुल वाजलं आहे. भारतात गेल्या काही वर्षात फुटबॉलची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. 2022 फुलबॉल वर्ल्डकप स्पर्धेवेळी ही लोकप्रियता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पात्र होण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. पात्रता फेरीत भारताच्या गटात कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ आहे. या गटात टॉप 2 वर असलेले संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तर सौदी अरेबियात होणाऱ्या 2027 एएफसी आशियाई कपसाठी थेट प्रवेश मिळेल. पात्रता फेरीतील पहिला सामना भारत आणि कुवैत यांच्यात गुरुवारी रात्री 10 वाजता होणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीच्या तिसऱ्या टप्प्यात कधीच प्रवेश केलेला नाही. पण या वर्षी टीम इंडियाची कामगिरी आणि कोच इगोर स्टिमकच्या मेहनतीमुळे आशा वाढल्या आहे. ग्रुपमधील तगडं आव्हान पाहता टीम इंडियाला चांगली सुरुवात करणं महत्त्वाचं आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 पात्रता फेरीसाठी 36 संघांना 9 गटात विभागलं गेलं आहे. म्हणजेच एका गटात चार संघ आहेत.भारत, कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे चार संघ आहेत. हे संघ घरच्या-बाहेरच्या मैदानावर राऊंड रॉबिन पद्धतीने खेळणार आहे. कतारचा संघ फिफा क्रमवारीत 61 व्या स्थानावर, कुवैत 136 व्या स्थानावर, अफगाणिस्तान 154 व्या स्थानावर, तर भारतीय संघ 102 व्या स्थानावर आहे. भारत आणि कुवैत यांच्यात गुरुवारी जबेर अल अहमद या आंतरराष्ट्रीय मैदानात सामना होणार आहे. त्यानंतर 6 जून 2024 रोजी हे दोन्ही संघ भारतात एकमेकांशी भिडणार आहेत.

भारतीय संघाचं पात्रता फेरीचं वेळापत्रक

  • 16 नोव्हेंबर, कुवैत विरुद्ध भारत, रात्री 10 वाजता, जबेर अल अहमद, कुवैत सिटी
  • 21 नोव्हेंबर, कतार विरुद्ध भारत, संध्या 7 वाजता, कलिंग स्टेडियम भुवनेश्वर
  • 21 मार्च, अफगाणिस्तान विरुद्ध भारत (ठिकाण ठरलं नाही)
  • 26 मार्च, भारत विरुद्ध अफगाणिस्तान, इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियम, गुवाहटी
  • 6 जून, भारत विरुद्ध कुवैत, (ठिकाण ठरलं नाही)
  • 11 जून, भारत विरुद्ध कतार, (ठिकाण ठरलं नाही)

भारतीय फुटबॉल संघ

  • गोलकीपर : अमरिंदर सिंग, गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ
  • डिफेंडर: आकाश मिश्रा, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, निखिल पुजारी, राहुल भेके, रोशन सिंग नौरेम, संदेश झिंगन, सुभाषीष बोस
  • मिडफिल्डर : अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, लालेंगमाविया, लिस्टन कोलाको, महेश सिंग नौरेम, रोहित कुमार, सहल अब्दुल समद, सुरेश सिंग वांगजाम, उदांता सिंग कुमाम
  • फॉरवर्ड्स : इशान पंडिता, लल्लियांझुआला छांगटे, मनवीर सिंग, राहुल केपी, सुनील छेत्री