जर्मन गोलकीपर ओलिवर कान याचं भारतीय फुटबॉलसाठी शुभस्य शीघ्रम! प्रशिक्षणासाठी उचललं मोठं पाऊल

भारतात फुटबॉलसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु आहे. क्रिकेट व्यतिरिक्त फुटबॉल जीव ओवाळून टाकणारे अनेकजण आहेत. पण त्यांना हवं तसं व्यासपीठ मिळत नाही. हीच बाब ओळखून फुटबॉलपटू ओलिवर कान याने मोठं पाऊल उचललं आहे.

जर्मन गोलकीपर ओलिवर कान याचं भारतीय फुटबॉलसाठी शुभस्य शीघ्रम! प्रशिक्षणासाठी उचललं मोठं पाऊल
भारतात लवकरच फुटबॉलला 'अच्छे दिन', जर्मन फुटबॉलपटू ओलिवर कान याने घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 3:43 PM

मुंबई : फिफा वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ असावा असं प्रत्येक भारतीयाला वाटतं. दर चार वर्षांनी असा क्षण येतो. मग कालांतराने लोकं विसरून जातात. पुन्हा क्रिकेटचे सामन्यावर लक्ष केंद्रीत होतं. पण गेल्या काही वर्षात भारतात फुटबॉलसाठी बरेच प्रयत्न होताना दिसत आहे.  विदेशी फुटबॉल क्लब भारतीयांची आवड पाहून त्या दृष्टीने गुंतवणूक सुरु केली आहे. त्याचा रिझल्ट जरी लगेच दृष्टीक्षेपात नसला तरी येत्या काही वर्षात चमत्कारिक बदल झाला तर आश्चर्य वाटायला नको. भारतात फुटबॉलप्रेम जागं करण्यासाठी आता दिग्गज फुटबॉलपटू ओलिवर कान याने कंबर कसली आहे. भारतात फुटबॉलपटू घडवण्यासाठी ओलिवर कान अकादमी सुरु केली आहे. या अकादमीच्या माध्यमातून भारतीयांना फुटबॉलचं शिक्षण मिळेल. तसेच भारतीय फुटबॉल प्रगतीपथावर नेण्यास मदत होणार आहे. फुटबॉलपटूच नाही तर या माध्यमातून एथलीट्सही घडवण्यास मदत होणार आहे. अकादमी संपूर्ण भारतात सुरु करण्याचा माजी जर्मन फुटबॉलपटू ओलिवर कान यांचा मानस आहे.

अकादमीत गोलरक्षक अर्थात गोलकीपर तयार करण्यावरही भर दिला जाणार आहे. गोलकीपर हा कोणत्याही संघाचा कणा असतो. ओलिवर कान हे जागतिक स्तरावरचे दिग्गज गोलकिपर होते. ओलिवर कान यांच्या अकादमीने महाराष्ट्रातील प्रो 10 सोबत भागीदारी करत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात फुटबॉलपटू घडवण्यास मदत होणार आहे.

ओलिवर कान यांनी आपल्या योजनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, ‘फुटबॉलमध्ये जबरदस्त कामगिरी करण्याची क्षमता भारतात आहे. फक्त फुटबॉलपटूंचं कौशल्य विकसित करण्यासाठी योग्य फुटबॉल शिक्षण, शिस्तबद्ध अभ्यासक्रम आणि जागतिक दर्जाच्या सुविधांची गरज आहे.फुटबॉलमध्ये भारताने नावलौकिक मिळवावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. मला विश्वास आहे की, भारत नक्कीच फुटबॉलमध्ये उंची गाठेल.’

कौशिक मौलिक (वरिष्ठ सल्लागार भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया, ऑलिव्हर कान अकादमी आणि गोलप्ले) यांनी सांगितलं की, “आम्हाला भारतात ओलिवर कान अकादमी सुरु करण्याचा अभिमान वाटतो. ओलिवर कान यांच्या अनुभवाचा भारतीय फुटबॉलपटूंना फायदा होईल. तसेच जागतिक दर्जाच्या फुटबॉलचं मार्गदर्शन मिळेल. भारताचं फुटबॉल पाहणाऱ्या देशाकडून फुटबॉल खेळणाऱ्या देशाकडे संक्रमण करायचं आहे.”

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.