Lionel messi : बार्सिलोना संघ सोडल्यानंतर लिओनल मेस्सी नव्या संघात दाखल, दोन वर्षांच्या करारावर लवकरच स्वाक्षरी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 7:38 PM

तब्बल 17 वर्षे बार्सिलोना संघाकडून जागतिक फुटबॉल गाजवल्यानंतर काही दिवसांपूर्वी मेस्सीने क्लबला अलविदा करण्याचा निर्णय़ घेतला. आता त्याने एका नव्या तगड्या संघासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Lionel messi : बार्सिलोना संघ सोडल्यानंतर लिओनल मेस्सी नव्या संघात दाखल, दोन वर्षांच्या करारावर लवकरच स्वाक्षरी
लिओनल मेस्सी
Follow us

मुंबई : जागतिक फुटबॉलमधील एक सर्वात मोठं नाव म्हणजे लिओनल मेस्सी (Lionel Messi). अर्जेंटीना देशाचा असणाऱ्या मेस्सीचे चाहते जगभरातील सर्व देशात आहेत. भारतातही असंख्य फॅन्स असणाऱ्या मेस्सीने काही दिवसांपूर्वी 17 वर्षे खेळत असलेला बार्सिलोना क्लब (barcelona) सोडण्याचा निर्णय घेतला आणि जगभरातील चाहत्यांना अक्षरश: रडू कोसळलं. खुद्द मेस्सीही क्लब सोडतानाच्या समारंभात ढसाढसा रडला. पण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन तसं म्हणत मेस्सीने एका नव्या संघात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. मेस्सीने त्याचा मित्र नेयमार ज्युनियर असणाऱ्या पॅरीस सेंट जर्मन अर्थात पीएसजी (PSG) संघासोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे.  

34 वर्षीय फुटबॉल स्टार मेस्सी दाखल होत असलेल्या पीएसजी संघात नेयमासह  फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेही आहे. काही दिवंसापूर्वीच रिअल मॅड्रीड संघातून बाहेर पडलेला सर्जिओ रामोसही याच संघात गेल्याने आता हा संघ जागतिक फुटबॉलमधील एक बलाढ्य संघ बनला आहे. अवघ्या 13 वर्षांचा असताना क्लबसोबत जोडल्या गेलेल्या मेस्सीचा करार ठराविक काळानंतर पुन्हा नव्याने करण्यात येत. 2017 मध्ये केलेला करार  30 जून, 2021 रोजी संपला आणि क्लब आणि मेस्सी यांच्यात नवीन करारातील आर्थिक आणि संरचनात्मक अडथळ्यांमुळे नवा करार होऊ शकला नाही. ज्यामुळे अखेर मेस्सीला संघ सोडावा लागला. आता मेस्सी लवकरच पीएसजी संघासोबत स्वाक्षरी करुन त्यांच्या पॅरीस येथील घरगुती मैदानात डेब्यू करु शकतो. 

कराराची किंमत अजूनही गुलदस्त्यात

मेस्सी आणि पीएसजी संघात होत असलेल्या कराराची किंमत अजूनही समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार मेस्सीला वार्षिक भारतीय रुपयांनुसार 257 कोटी इतकी फि दिली जाऊ शकते. मेस्सी जगातील सर्वात मोठा फुटबॉलपटू असल्याने त्याच्या कराराची किंमत ही डोळे दिपवणारी असणार हे नक्की. पण नेमकी किंमत अजूनपर्यंत समोर आलेली नाही. मेस्सी आधी देखील पीएसजी संघाने दोनदा फुटबॉल जगतातील सर्वाधिक पैशांचे करार केले आहेत. कायलिन आणि नेयमार यांना विकत घेताना हे करार करण्यात आले होते.

हे ही वाचा

Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!

दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

(Former barcelona star lionel messi is going to sign contract with PSG Football Club)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI