पॅरीस ऑलिम्पिकमधून मोठी बातमी, सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमची डोप टेस्ट

Arshad Nadeem dope test: पाकिस्तानी मीडियामधील बातम्यानुसार, भालाफेकमध्ये पदक विजेत्या तिन्ही खेळाडूंना स्टेडियममध्येच थांबवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची डोपिंग टेस्ट करण्यात आली. ऑलिम्पिकमधील नियमानुसार ही टेस्ट करण्यात आली.

पॅरीस ऑलिम्पिकमधून मोठी बातमी, सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमची डोप टेस्ट
Arshad Nadeem
| Updated on: Aug 09, 2024 | 2:08 PM

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत पाकिस्तान खेळाडू अर्शद नदीम याने इतिहास निर्माण केला. त्याने 92.97 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. पाकिस्तानमधील वैयक्तीक सुवर्णपदक मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यानंतर स्टेडियममध्ये त्याची आता डोपिंग टेस्ट करण्यात आली आहे. पाकिस्तानी माध्यमानुसार तो अजून दोन, तीन तास स्टेडियममध्ये राहणार आहे.

तिन्ही खेळाडूंना थांबवले

पाकिस्तानी मीडियामधील बातम्यानुसार, भालाफेकमध्ये पदक विजेत्या तिन्ही खेळाडूंना स्टेडियममध्येच थांबवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची डोपिंग टेस्ट करण्यात आली. ऑलिम्पिकमधील नियमानुसार ही टेस्ट करण्यात आली. पदक विजेता खेळाडूंची स्पर्धेनंतर डोपिंग टेस्ट केली जाते. त्यामुळे अर्शद नदीमसोबत भारताचा नीरज चोप्रा आणि ग्रेनाडाचा एंडरसन पीटर्स यांचीही डोपिंग टेस्ट झाली आहे.

पदक जिंकल्यानंतर काय म्हणाला अर्शद

सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शद नदीम म्हणाला की, चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. काही काळापूर्वी गुडघ्याच्या दुखण्यामुळे मी त्रासलो होतो. त्यामुळे फिटनेसवर काम केले. कठोर मेहनत केली. त्यामुळेच 92.97 मीटर भाला फेकू शकलो. अर्शद याला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. तो चांगली गोलंदाजी करतो. परंतु त्याच्या शरीराची रचना पाहून त्याला भाला फेकीत करीअर करण्याचा सल्ला दिला गेला. आज तो गोल्ड मेडलिस्ट बनला.

सोशल मीडियावर डोपिंग ट्रेंड

सोशल मीडियावर डोपिंग ट्रेंड सुरु आहे. अर्शद नदीम याने 92.97 मीटर भाला फेकला आहे. त्यावर लोकांचा विश्वास बसत नाही. त्याची डोपिंग टेस्ट करण्याची मागणी सोशल मीडियावरील युजर करत आहेत. त्यासाठी जुनी उदाहरण दिले जात आहे. 1988 मध्ये कॅनडाचा बेन जानसन याने सुवर्णपदक जिंकले होते. कार्ल लुइस दुसऱ्या स्थानावर होतो. परंतु डोपिंग टेस्टमध्ये बेन दोषी सापडला. त्यामुळे कार्ल लुइस याला सुवर्णपदक दिले गेल्याचे युजर म्हणतात. नदीम याने आश्चर्यकारक पद्धतीने एक नव्हे तर दोन वेळा 90 मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकला आहे.