Women’s Asian Champions Trophy | कोरियाला धोबीपछाड, टीम इंडिया फायनलमध्ये, आता जपान विरुद्ध लढत

| Updated on: Nov 05, 2023 | 12:59 AM

Women's Asian Champions Trophy Semi Final 2 | वूमन्स एशियन चॅम्पियन मधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण कोरिया यांच्यात लढत झाली. मात्र टीम इंडियासमोर दक्षिण कोरिया फुस्स ठरली.

Womens Asian Champions Trophy | कोरियाला धोबीपछाड, टीम इंडिया फायनलमध्ये, आता जपान विरुद्ध लढत
Follow us on

मुंबई | आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने सलग 7 सामने जिंकून सेमी फायनलमध्ये रुबाबदार एन्ट्री केली. आता टीम इंडिया रविवारी 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध आपला आठवा सामना खेळणार आहे. टीम इंडिया पॉइंट्स टेबलमधील अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. या दरम्यान हॉकी वूमन्स टीम इंडियाने उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरुन आली आहे. वूमन्स हॉकी टीमन इंडियाने एशियन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

वूमन्स टीम इंडियाने दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात रौप्य पदक विजेत्या दक्षिण कोरियावर एकतर्फी विजय मिळवलाय. टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. टीम इंडियाने यासह फायनलचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने अंतिम राउंड रॉबिन सामन्यात दक्षिण कोरियाला 5-0 ने पराभूत केलं होतं. दरम्यान या सेमी फायनल सामन्यात सलीमा टेटे हीने 11 व्या मिनिटाला गोल केला. तर दुसरा गोल महाराष्ट्राची कन्या वैष्णवी फाळके हीने 19 व्या मिनिटाला केला.

गोल्ड मेडलसाठी सामना केव्हा?

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह रौप्य पदक निश्चित केलंय. मात्र टीम इंडियाचं लक्ष हे सुवर्ण पदकाकडे आहे. टीम इंडियाचा सुवर्ण पदकासाठी सामना हा जपान विरुद्ध होणार आहे. हा सामना रविवारी 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. जपानने पहिल्या सेमी फायनल सामन्यात चीनला पराभूत केलं. जपानने चीनला 2-1 अशा फराने नेस्तानाबूत केलं. त्यामुळे आता रविवारी टीम इंडिया विरुद्ध जपान यांच्यात महामुकाबला होणार आहे. टीम इंडियाच्या रणरागिणींकडे तमाम हॉकी चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाची सुपर कामगिरी

सोशल मीडियावर कौतुक

दरम्यान या विजयानंतर टीम इंडियाचं सोशल मीडियावर कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे. हॉकी टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच महाअंतिम सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या जात आहे. त्यामुळे तमाम भारतीयंना टीम इंडियाच्या महिलांकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा लागून राहिली आहे.