
आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत आणि चीन हे संघ आमनेसामने आले होते. बिहारच्या राजगीरध्ये हा सामना खेळला गेला. पहिल्याच सामन्यात भारताने चीनला 4-3 ने मात दिली. या सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंहने तीन गोल मारले. चीनने पहिला गोल 12 मिनिटाला मारला आणि भारतावर दबाव आणला होता. मात्र त्यानंतर जुगराज सिंहने 18 व्या मिनिटाला गोल केला आणि बरोबरी साधली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 व्या आणि 33 व्या मिनिटाला गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. चीनकडून चेन बेनहाईने 35 व्या मिनिटाला गोल मारला आणि 3-2 अशी स्थिती आणली. त्यानंतर गाओ जिशेंगने 41 व्या मिनिटला गोल मारला आणि 3-3 अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटतो की काय अशीस स्थिती होती. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने 47 व्या मिनिटाला गोल मारला आणि सामना आपल्या पारड्यात झुकवला. भारताने हा सामना 4-3 ने जिंकला.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात गोलची हॅटट्रीक मारली. त्याच्या तीन गोलमुळेच भारताला विजय मिळवणं शक्य झालं. पहिला गोल त्याने 20 व्या मिनिटाला केला. दुसरा गोल तिसऱ्या सत्राच्या तिसऱ्या मिनिटाला केला. पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये केलं. तसेच शेवटच्या सत्राच्या दुसऱ्या मिनिटाला निर्णायक गोल मारला. हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नर मारत संघाला 4-3 ने विजय मिळवून दिला. आता भारताचा पुढचा जापानशी होणार आहे. हा सामना 31 ऑगस्टला होणार आहे. भारताच्या गटात चीन, कझाकिस्तान आणि जापान हे संघ आहेत. त्यापैकी चीनला साखळी फेरीत मात दिली आहे.
𝗪𝗜𝗡 to begin! 🙌
India beat China in a closely contested match at the Hero Asia Cup, Rajgir, Bihar, 2025.
🇮🇳 4-3 🇨🇳#HockeyIndia #IndiaKaGame #HumSeHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/tEJbdlBUTT
— Hockey India (@TheHockeyIndia) August 29, 2025
आशिया कप स्पर्धेचं हे 12वं पर्व असून भारताने तीन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2003, 2007 आणि 2017 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. तसं पाहिलं तर दक्षिण कोरियाचा या स्पर्धेत दबदबा राहिला आहे. त्यांनी पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. 1994, 1999, 2013 आणि 2022 मध्ये विजय मिळवला आहे. आता या स्पर्धेत भारत प्रमुख दावेदार आहे. भारताने जेतेपद मिळवलं तर बेल्जियम-नेदरलँडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरेल.