नुसतं स्टेडियम उभारुन चालणार नाही, फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारताचा दरारा निर्माण व्हावा: उद्धव ठाकरे

| Updated on: Jan 16, 2022 | 12:50 PM

नवी मुंबई येथील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व्हर्च्युअल पद्धतीने या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

नुसतं स्टेडियम उभारुन चालणार नाही, फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारताचा दरारा निर्माण व्हावा: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us on

नवी मुंबई : येथील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व्हर्च्युअल पद्धतीने या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, एकाच ठिकाणी सर्व खेळांसाठीचं व्यासपीठ तयार झालं आहे, याचा खूप आनंद आहे. अशी व्यवस्था असणारं कदाचित महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य असावं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मला फुटबॉलचं फार ज्ञान नाही, मात्र आदित्यला (आदित्य ठाकरे) फुटबॉल खेळायला आवडतं, तेजस (ठाकरे) तर मोठ्या स्तरावर फुटबॉल खेळला आहे. या दोघांमुळे अनेकदा फुटबॉलचे सामने पाहायला मिळाले आहेत. अनेकदा सामने पाहायला जाणं व्हायचं. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, फुटबॉल हा केवळ पायाने खेळायचा खेळ नव्हे, यात देखील बुद्धीचा खूप वापर करावा लागतो. जितका बुद्धीबळ खेळताना करावा लागतो तितकाच यातदेखील बुद्धीचा वापर होतो.

मुख्यमंत्री म्हणाले की, या मैदानावर खेळून अनेक चांगले फुटबॉलपटू घडतील, अशी मला अपेक्षा आहे. तसेच नुसती मैदान बनवून, स्टेडियम उभारुन चालणार नाही, भारताचा संघ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊन तिथे भारताचा दरारा निर्माण व्हावा, अशी माझी इच्छा आहे. तसेच लवकरच या मैदानावर महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा (AFC Women Asian Cup 2022) होतेय, त्यासाठी शुभेच्छा. आपला संघ यात चांगली कामगिरी करेल, अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.

AFC Women Asian Cup 2022 स्पर्धा महाराष्ट्रात

कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी AFC महिला आशिया चषक भारत 2022 स्पर्धेच्या स्थानिक कार्यक्रमासाठी सुरक्षा प्रोटोकॉलवर चर्चा केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (AIFF) अध्यक्ष आणि LOC चे चेअरमन प्रफुल्ल पटेल, AIFF सचिव कुशल दास आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी “महाराष्ट्रातील परिस्थितीची पाहणी केली आणि स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे”. यात सविस्तर योजना आखण्यात आली आहे. सर्व सहभागींना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान केली जाईल.

इतर बातम्या

Virat Kohli: विराटच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे ‘हे’ पाच प्रश्न निर्माण झाले, त्याची उत्तर कधी मिळणार?

Virat Kohli: आकडे खोटं बोलणार नाहीत! विराट भारताचाच नाही, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा यशस्वी कॅप्टन

ViratKohli: Wisden इंडियाने खास टि्वट करुन विराटच्या कॅप्टनशिपला केला सलाम

(India should dominate football World Cup : Uddhav Thackeray)