Kho Kho World Cup : पुरुष भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये, अतितटीच्या सामन्यात विजय

खो खो वर्ल्डकप 2025 स्पर्धेत टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेवर निसटता विजय मिळवला आहे. भारताला उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेने चांगलंच झुंजवलं. दुसऱ्या डावापर्यंत कोण सामना जिंकेल याची धाकधूक लागून होती.

Kho Kho World Cup : पुरुष भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये, अतितटीच्या सामन्यात विजय
| Updated on: Jan 18, 2025 | 9:52 PM

खो खो वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय मेन्स संघाने वुमन्स संघानंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात भारताला विजयासाठी चांगलंच झुंजावं लागलं. भारताने दुसऱ्या डावात 8 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे तिसऱ्या डावात भारताला काहीही करून चांगला डिफेंस करणं भाग होतं. पण दक्षिण अफ्रिकन संघाने हा फरक कमी केला आणि गुणांची आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम अटॅक करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात अटॅक करत 18 गुणांची कमाई केली. दुसरीकडे डिफेंस करताना भारताला चांगलंच झुंजवलं आणि दोन ड्रीम रन गुण मिळवले.  पण भारताने चांगला अटॅक केला आणि 28 गुणांची कमाई केली. त्यामुळे दुसऱ्या डावाअखेर भारताकडे 8 गुणांची आघाडी होती.  पण दक्षिण अफ्रिकेने तिसऱ्या डावात कमबॅक करत ही आघाडी मोडून काढली. दक्षिण अफ्रिकेने 42-28 अंतर ठेवलं.  तसेच भारताला विजयाचा अंतर कापण्यासाठी 14 धावांची आघाडी मिळाली.  भारताला हा सामना जिंकायचा तर 16 गुण मिळवणं भाग होतं. तसेच ड्रीम रन मिळणार नाही याची काळजी घ्यायची होती.  भारताने 60-42 ने हा सामना जिंकला. भारतीय संघ 18 गुणांनी दक्षिण अफ्रिकेवर वरचढ ठरला आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारत : प्रतीक वायकर (कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो, सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग.
स्टँडबाय : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम.

दक्षिण आफ्रिका: मालिबोन्ग्वे त्यत्येका, बेंजामिन गोईत्सेमोदिमो, तेबुगो मोकुमी, थाटो मोटलांग, म्दुदुझी जेफरी, डोनाल्ड मोसिना, लेथलहोगोनोलो स्टॉर्क, न्हालालवेन्हले खोझा, गॉर्डन सिबिया, झोलिसिल आफाने, सिफो एमजीकोबो, ॲलेक्स फिरी, ली बोथ्सोनी, जोबोनी, लीबी, जोबोनी