AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sheshnaag 150 Drone : इराणच्या शाहेद-136 पेक्षा भारताने बनवलं स्वत:च अत्यंत घातक ड्रोन, जाणून घ्या त्याची खासियत

Sheshnaag 150 Drone : इराणकडे स्वत:च शाहेद-136 ड्रोन आहे, अमेरिकेकडे LUCAS ड्रोन आहे. तसं भारताकडे स्वत:च असं कुठलं Attack ड्रोन आहे. भारताने अत्यंत कमी कालावधीत स्वत:च असं एक घातक ड्रोन विकसित केलं आहे. त्याचं नाव आहे...

Sheshnaag 150 Drone : इराणच्या शाहेद-136 पेक्षा भारताने बनवलं स्वत:च अत्यंत घातक ड्रोन, जाणून घ्या त्याची खासियत
Image Credit source: X/Manish Pangotra
| Updated on: Mar 06, 2026 | 12:11 PM
Share

इराण युद्धात अमेरिका आणि इस्रायलकडून मार खातोय. पण तरीही त्यांच्याकडून शत्रू देशांवर जोरदार प्रतिहल्ले सुरु आहेत. यात इराणसाठी सर्वात घातक अस्त्र ठरलय ते त्यांचं स्वस्तातलं शाहेद-136 ड्रोन. अमेरिकेच्या LUCAS ड्रोनने सुद्धा कमी किंमतीत बरचं नुकसान केलं आहे. या ड्रोनद्वारे शत्रुच्या महागड्या एअर डिफेन्स सिस्टिमवर मोठ्या प्रमाणात हल्ला करुन चकवता येऊ शकतं. भारताने सुद्धा आपलं उत्तर तयार केलं आहे. बंगळुरुच्या न्यूस्पेस रिसर्च टेक्नोलॉजी (NRT) कंपनीने शेषनाग-150 नावाचं एक ड्रोन विकसित केलं आहे. हे एक लांब पल्ल्याचं हल्ला करणारं स्वार्म ड्रोन आहे. हे ड्रोन पूर्णपणे स्वदेशी आहे. या ड्रोनच्या निर्मितीमध्ये वेगाने प्रगती सुरु आहे. वर्षभरापूर्वी या ड्रोनने पहिलं उड्डाण केलं होतं. ऑपरेशन सिंदूर नंतर अशा प्रकारच्या ड्रोनची गरज तीव्रतेने जाणवत आहे.

शेषनाग-150 एक लांब पल्ल्याचं लॉयटरिंग म्युनिशन आहे. लक्ष्याच्या वर घिरट्या घालून ते टार्गेटची टेहळणी करतं. त्यानंतर हल्ला करतं. याची रेंज 1000 किलोमीटरपेक्षा पण जास्त आहे. पाच तासापेक्षा अधिक वेळ ते हवेत राहू शकतं. यात 25 ते 40 किलो वॉरहेड फिट करता येऊ शकतं. इमारती, वाहनं, रडार तसचं सैन्य तळ याचं मोठं नुकसान होऊ शकतं. हे ड्रोन स्वार्म हल्ला करुन शकतं. स्वार्म हल्ला म्हणजे झुंडीने टार्गेच्या दिशेने झेपावणं.

GPS बंद झाल्यावरही ही सिस्टिम काम करते

ड्रोन स्वार्मद्वारे शत्रुची एअर डिफेन्स सिस्टिम ओवरलोड करुन तोडता येऊ शकते. ड्रोन स्वत: लक्ष्याचा शोध घेतं, ट्रॅक करतं आणि हल्ला करतं. GPS बंद झाल्यावरही ही सिस्टिम काम करते. कारण यात विजुअल नेविगेशन सिस्टिम आहे. कॅमेऱ्याने रस्ता पाहता येतो.

रहस्य त्याचा स्वदेशी मदर कोड

शेषनाग-150 चं खरं रहस्य त्याचा स्वदेशी मदर कोड आहे. हा एक खास सॉफ्टवेयर आहे. अनेक ड्रोन्सना ते एकाचवेळी कंट्रोल करतं. ड्रोन्स आपसात चर्चा करतात, स्वत: प्लान बनवतात आणि हल्ला करतात. एक ड्रोन खराब झालं, तर बाकीचं आपलं काम सुरु ठेवतात. हे कोडच ड्रोनला भरपूर स्मार्ट बनवतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...