दौंड रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये लेफ्टनंट कर्नल महादेव घुगे यांची यशस्वी कामगिरी

Lieutenant Colonel Mahadeo Ghuge | लेफ्टनंट कर्नल महादेव घुगे यांनी पुण्यात आयोजित करण्या आलेल्या दौंड रायसिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिी केली आहे.

दौंड रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये लेफ्टनंट कर्नल महादेव घुगे यांची यशस्वी कामगिरी
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 5:12 PM

पुणे | बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या तरुणांमध्ये वयाच्या तिशी-चाळीशीतच अनेक आजाराचं प्रमाण दिसून येतं. जिने चढल्यानंतर धाप लागते. अशा एका ना अनेक समस्या तरुणांमध्ये दिसून येतात. मात्र वयाच्या पन्नाशीनंतरही लेफ्टनंट कर्नल महादेव घुगे हे अपवाद आहेत. घुगे यांचा फिटनेस आणि उत्साह हा तरुणांना लाजवेल असा आहे. घुगे यांनी दौंडमध्ये आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घुगे यांनी या हाफ मॅरेथॉनमध्ये उपविजेतेपद पटकावलं. टीम ब्लू ब्रिगेडने दौंड रायझिंग हाफ मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं.

सैन्य दलातील अधिकारी म्हटल्यावंर पिलदार शरीरयष्टी, वक्तशीरपणा आणि स्वंयशिस्त अशी प्रतिमा सर्वसामांन्यांच्या चेहऱ्यासमोर उभी राहते. महादेव घुगे यांनी दौंडमधील हाफ मॅरेथॉनमध्ये केलेल्या कामगिरीतून त्यांनी फिटनेस, खेळाप्रती असलेली आवड आणि अनेक बाबींचं दर्शन घडवलंय. आवड असली आणि ध्येयप्राप्तीचं वेड असलं तर काहीही करता येत, हे देखील घुगे यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.

लेफ्टनंट कर्नल महादेव घुगे यांचं अभिनंदन

लेफ्टनंट कर्नल घुगे यांचं हाफ मॅरेथॉनमधील सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. घुगे यांचे आजी माजी सहकारी, समवयस्क, वरिष्ठ आणि विविध स्तरांमधील दिग्ग्जांकडून अभिनंदन करण्यात आले. घुगे यांची ही कामगिरी लष्करातील आणि त्यापुढील महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी प्रेरणादायक अशी आहे.

लहाणपणापासूनच धावण्याची आवड

लेफ्टनंट कर्नल महादेव घुगे हे मुळचे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील. घुगे यांना शालेय जीवनापासून धावण्याची आवड असल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना मला मैदानी खेळात रस होता. मी धावण्याच्या शर्यतीत आवडीने सहभागी व्हायचो. घुगे शाळेच्या हॉकी आणि फुटबॉलमध्येही होते. घुगे यांनी सातवी आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षणादरम्यान एकूण 30 पदकांची लयलूट केली.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.