
पॅरिस ऑलिम्पिक म्हटलं की आता मनु भाकरचं नाव घेतलं जाणार आहे. वयाच्या अवघ्या 22 वर्षी पोरीने इतिहास रचला आहे. मनु भाकरने भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकले असून अशी कामगिरी ती पहिली खेळाडू ठरली आहे. एकाच खेळाडूने दोन ऑलिम्पिक जिंकलेत यामध्ये पी.व्ही. सिंधू आणि सुशील कुमार यांचा समावेश आहे. पण मनुने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवलेत. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र आणि 10 मीटर एअर पिस्तूल महिला यामध्ये मनुने कौतुकास्द कामगिरी करत कांस्यदकाटी कमाई केली आहे. मनु भाकरचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे. मात्र यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याआधीचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. मनु भाकर कोण आहे? मनु भाकरचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 मध्ये हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील जाट कुटुंबात झाला होता. मनुचे वडील राम किशन मर्चंट नेव्हीमध्ये तर आई सुमेधा भाकर शाळेमध्ये मुख्याध्यपिका होत्या. मनुने डॉक्टर बनावं अशी तिच्या आईची इच्छा...