
TV9 नेटवर्ककडून कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धा आणि इंडियन टायगर्स अँड टायग्रेस फुटबॉल स्पर्धेचं गेल्या वर्षी यशस्वीरित्या आयोजिन करण्यात आलं. त्यानंतर आता टीव्ही9 नेटवर्ककडून कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हे हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अॅकेडमीत करण्यात आलं. या स्पर्धेचा थरार एकूण 3 दिवस रंगणार आहे. ही स्पर्धा 9 ते 11 मे दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी 6 मे ही अंतिम तारीख होती. त्यानंतर आता या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत आघाडीचे कॉर्पोरेट्स कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार 9 मे पासून रेड्डीज, मायक्रोसॉफ्ट, एक्सेंचर, इन्फोसिस, विप्रो, अॅमेझॉन, जेनपॅक्ट, कॅपजेमिनी आणि इतर अनेक कंपन्यांमधील कर्मचारी सहभागी होणार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात फुटबॉल आणि बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करून देशभरात क्रीडा संस्कृतीला चालना देणं, असा उद्देश टीव्ही9 नेटवर्कचा आहे. हा कार्यक्रम स्पर्धेच्या पलीकडला आहे. विविध कॉर्पोर्ट्समधील कर्मचाऱ्यांची मैत्री व्हावी, कॉर्पोरेट संबंधांना चालना मिळावी तसेच क्रीडा भावना निर्माण व्हावी, असाही उद्देश टीव्ही9 नेटवर्कचा आहे.
स्पर्धेचं नाव : न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025
स्पर्धेच्या आयोजनचं ठिकाण : पी गोपीचंद बॅडमिटंन अकॅडेमी, हैदराबाद
स्पर्धेची तारीख : 9 ते 11 मे
स्पर्धेच्या वेळापत्रकासाठी क्लिक करा
टीव्ही9 नेटवर्क आघाडीचं माध्यम समूह आहे. टीव्ही9 नेटवर्कने समाजातील विविध घटकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासह समाजभानही जपलं आहे. टीव्ही9 नेटवर्ककडून याआधी आयोजित करण्यात आलेल्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेस फुटबॉल स्पर्धेमुळे समाजातील अनेक वंचित आणि प्रतिभावान युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या निवडक आणि यशस्वी खेळाडूंना पुढील प्रशिक्षणासाठी विदेशात पाठवण्यात आलंय. हेच युवा खेळाडू भविष्यात भारताचं प्रतिनिधित्व करतील असा विश्वासही टीव्ही9 नेटवर्कला आहे.