Paris Olympic 2024 : न्यूझीलंडच्या पराभवामुळे भारतीय हॉकी संघाला फायदा, थेट उपांत्यपूर्व फेरीत मिळवली जागा

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पारड्यात दोन कांस्य पदक पडली आहे. नेमबाजीत मनु भाकरने ही पदकं भारताला मिळवून दिली आहे. आता इतर खेळातून भारताला अपेक्षा आहेत. खासकरून हॉकी संघाकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने कांस्य पदक पटकावलं होतं. आता सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

Paris Olympic 2024 : न्यूझीलंडच्या पराभवामुळे भारतीय हॉकी संघाला फायदा, थेट उपांत्यपूर्व फेरीत मिळवली जागा
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 30, 2024 | 10:43 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघ चांगली कामगिरी करत आहे. भारताने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला 3-2 ने पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिना 1-1 ने बरोबरीत रोखलं होतं. तिसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाचा 2-0 ने धु्व्वा उडवला होता. यासह ब गटात भारताने टॉप स्थान मिळवलं आहे. सात गुणांसह भारतीय संघ या गटात टॉपला आहे. असं असताना भारताने उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्कं केलं आहे. कारण अर्जेंटिनाने न्यूझीलंडला पराभूत केलं आणि त्याचा थेट फायदा भारताला झाला आहे. ब गटात एकूण सहा संघ आहेत. साखळी फेरीचे सामने खेळल्यानंतर टॉप चार मध्ये असलेले संघ क्वॉर्टर फायनलमध्ये जागा मिळवतील. आता न्यूझीलंड आणि आर्यंलडचं गणित पाहता भारताचं उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्कं झालं आहे.

साखळी फेरीत प्रत्येक संघाला एकूण पाच सामने खेळायचे आहेत. भारताने पाच पैकी तीन सामने खेळले आहेत. त्यात 7 गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड आणि आयर्लंड हे संघ तीन सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यात त्यांच्या पदरी यश पडलं आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामने जिंकले तरी फक्त सहा गुणांची कमाई होईल. त्यामुळे भारताचे आताच 6 गुण आहेत. त्यामुळे ब गटातून भारत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठऱला आहे.

भारताने 3 सामने खेळून 7 गुण, बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया 6 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. अर्जेंटिना 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड आणि आयर्लंडची गुणांची झोळी रिती आहे. भारताचे उर्वरित सामना बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. बेल्जियमविरुद्ध चौथा सामना 2 ऑगस्टला आणि पाचवा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 ऑगस्टला होणार आहे.

हॉकी टीम इंडिया : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग (उपकर्णधार), पीआर श्रीजेश (गोलकीपर), मनप्रीत सिंग (मिडफिल्डर), जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित, संजय, राज कुमार पॉल, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद , अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग आणि गुरजंत सिंग.

राखीव खेळाडू: गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक, मिडफिल्डर नीलकंठ शर्मा आणि बचावपटू जुगराज सिंग.