Pro Kabaddi 2023-24: पुणेरी पलटणच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला मुंबईचा पंकज मोहिते, जर तसं झालं नसतं तर…

प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या पर्वात पुणेरी पलटणने हरयाणा स्टीलर्सवर तीन गुणांनी विजय मिळवला. या विजयात पंकज मोहितेचा खरा हात आहे. त्याच्या एका रेडने सामन्याचं चित्रच पालटलं आणि पुण्याचा विजय सोपा झाला.

Pro Kabaddi 2023-24: पुणेरी पलटणच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला मुंबईचा पंकज मोहिते, जर तसं झालं नसतं तर...
Pro Kabaddi 2023-24: मुंबईच्या पंकज मोहितेमुळे पुणेरी पलटणचा विजय शक्य, त्या रेडने सामन्याचं चित्रंच पालटलं
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 9:50 PM

मुंबई : प्रो कबड्डी लीग 2024 स्पर्धेचं जेतेपद पुणेरी पलटणने जिंकली. 74 दिवसांच्या अतितटीच्या 12 संघांमध्ये रंगलेल्या सामन्यानंतर हरयाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांनी अंतिम फेरीत एन्ट्री मारली होती. पुण्याने हरयाणावर 28-25 ने मात दिली. अवघ्या 3 गुणांनी पुण्याने हरयाणाला पराभूत केलं. पुणेरी पलटणने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कोर्टात राहणं पसंत केलं. हरयाणाच्या विनयची पहिली रेड फुकट गेली. त्यानंतर पुण्याने हरयाणावर आघाडी घेण्यास सुरुवात केली. पहिल्या ब्रेकमध्ये पुण्याने हरयाणा स्टीलर्सवर 10-13 गुणांनी आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही पुण्याने आघाडी घेतली. पण एक क्षण असा आला की या दोन्ही संघातील अवघ्या काही गुणांचं होतं. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली होती. मध्येच जल्लोष करणारा प्रेक्षकवर्ग शांत होत होता. तर कधी आपल्या बाजूने कल लागला जोराने ओरडत संघाला साथ देत होती. दुसऱ्या डावात जेव्हा अतितटीचा सामना सुरु होता पंकज मोहितेची रेड पुण्याला फायदेशीर ठरली. त्याच्यचा 4 गुणांमुळे पुणेरी पलटणला फायदा झाला.

पंकज मोहितेने एकूण 10 रेड टाकल्या. यातील दोन रेड विना प्वॉइंट परत आल्या. तर दोन रेडमध्ये नुकसान झालं. मात्र 6 रेड्स यशस्वी ठरल्या. यातील एक रेड पुण्याच्या पथ्यावर पडली. कारण पंकज मोहिते त्यांच्या कोर्टवर जाऊन 4 गुण घेऊन आला होता. या विजयानंतर पंकज मोहिते आनंद व्यक्त केला आहे. सामन्यानंतर पंकज मोहिते म्हणाला की, “जेतेपद मिळवल्यानंतर आनंद झाला आहे. आम्ही या वर्षी खूप मेहनत घेतली होती. त्याला खऱ्या अर्थाने विजयाचा मुलामा लागला आहे. त्या रेडने आमचा आत्मविश्वास वाढला. कारण त्या 4 गुणांमुळे त्यांच्या आणि आमच्या गुणांतील अंतर वाढलं. तर रेडर्संनाही त्याचा फायदा झाला.”

पुणेरी पलटणचे प्रशिक्षक वीसी रमेश यांनीही आनंद व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र यंदाच्या पर्वात जबरदस्त कमबॅक करत जेतेपदावर नाव कोरलं. “आम्ही बरीच मेहनत घेतली होती. ठरवलेल्या प्लाननुसार आम्ही खेळत राहिलो आणि संपूर्ण स्पर्धेत आम्हाला यश मिळालं. सातत्य खूपच महत्त्वाचं होतं. पंकजच्या रेडमुळे आम्हाला फायदा आणि आमचा विजय निश्चित झाला.”, असं प्रशिक्षक वीसी रमेश यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.