AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pro Kabaddi League PKL 2021-22: मोक्याच्याक्षणी गुजरातने सामना फिरवला, अभिषेकच्या जयपूरचा पराभव

सुरुवातीला गुजरातने जायंटसने रेड म्हणजे चढाई आणि टॅकल म्हणजे पकडीमध्ये दमदार कामगिरी करत आघाडी घेतली होती. गुजरात जायंटसकडे 15 तर जयपूर पिंक पँथर्सकडे 7 गुण होते.

Pro Kabaddi League PKL 2021-22: मोक्याच्याक्षणी गुजरातने सामना फिरवला, अभिषेकच्या जयपूरचा पराभव
प्रो-कबड्डी इन्स्टाग्राम
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 8:47 PM
Share

बंगळुरु: मोक्याच्याक्षणी कामगिरी उंचावत गुजरात जायंटसने (Gujarat Giants) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) सात गुणांनी पराभव केला. गुजरातने 34-27 ने अभिषेकच्या पिंक पँथर्सवर विजय मिळवला. प्रो कबड्डी लीगचा (ProKabaddiLeague) आज दुसरा दिवस आहे. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्स आणि गुजरात जायंटसमध्ये अटी-तटीचा सामना सुरु होता. प्रत्येक गुणांसाठी लढाई सुरु होती. बचावपटूंच्या दमदार कामगिरीमुळे गुजरातला सामना जिंकता आला.

गुजरातने जायंटसने रेड म्हणजे चढाईत 14 गुण घेतले, तर टॅकलमध्ये 13 गुण मिळवले. जयपूरने रेड म्हणजे चढाईत 16 इतके गुण तर टॅकल म्हणजे पकडीत फक्त सात गुण मिळवले.

पहिल्या हाफमध्ये गुजरात जायंटसकडे फक्त दोन गुणांची आघाडी होती. गुजरात जायंटस 19 तर जयपूर पँथर्सकडे 17 गुण होते. सुरुवातीला गुजरातने जायंटसने रेड म्हणजे चढाई आणि टॅकल म्हणजे पकडीमध्ये दमदार कामगिरी करत आघाडी घेतली होती. गुजरात जायंटसकडे 15 तर जयपूर पिंक पँथर्सकडे 7 गुण होते. पण पाच मिनिटात आठ गुण घेऊन जयपूरने गुजरातशी बरोबरी साधली.

सामना संपायला पाच मिनिटं बाकी असताना दोन्ही टीम्स बरोबरीत होत्या. प्रत्येक गुणासाठी संघर्ष सुरु होता. मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत गुजरात जायंटसने जयपूरला ऑलआऊट करत तीन गुणांची आघाडी घेतली व जयपूर पिंक पँथर्सचा सात गुणांनी पराभव केला.

संबंधित बातम्या:

IPL 2022: ब्रायन लारा आणि डेल स्टेनने IPL मधील ‘या’ संघाच्या प्रशिक्षकपदाची स्वीकारली जबाबदारी IPL 2022 Mega Auction: लिलावाची तारीख ठरली, बंगळुरुत ‘या’ दिवशी जमणार संघ मालक धक्कादायक! मुंबईत एका डावात 10 विकेट घेणाऱ्या एजाजला न्यूझीलंडने वगळलं

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.