IPL 2022: ब्रायन लारा आणि डेल स्टेनने IPL मधील ‘या’ संघाच्या प्रशिक्षकपदाची स्वीकारली जबाबदारी

व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांची एनसीएच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संघाचे मार्गदर्शकपद सोडले.

IPL 2022: ब्रायन लारा आणि डेल स्टेनने IPL मधील 'या' संघाच्या प्रशिक्षकपदाची स्वीकारली जबाबदारी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 23, 2021 | 3:57 PM

हैदराबाद: आयपीएलचे माजी विजेते सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) कोचिंग स्टाफमध्ये काही बदल केले आहेत. गुरुवारी त्यांनी ही माहिती दिली. 2022 च्या सीझनसाठी सनरायजर्स हैदराबादने ब्रायन लारा (Brian Lara) आणि डेल स्टेनचा (Dale Steyn) समावेश केला आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि प्रतिभावान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराची संघाच्या बॅटिंग कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचा तो सल्लागारही असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचा माजी डावखुरा फलंदाज हेमान बदानीची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर सायमन कॅटिच SRH चे सहाय्यक प्रशिक्षक असणार आहेत.

हेड कोच टॉम मुडी यांच्या नेतृत्वाखाली सपोर्ट स्टाफमधील सर्वजण काम करतील. मुरलीधरन फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. मागच्यावर्षी टॉम मुडी यांनी SRH च्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांची एनसीएच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संघाचे मार्गदर्शकपद सोडले.

यावर्षीच्या आयपीएलमध्ये एसआरएचची कामगिरी खूपच निराशाजनक होती. कर्णधार केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादचा संघ तळाला होता. यावेळी हैदराबाद संघात अब्दुल समाद आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांचा समावेश करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या:

VIDEO: महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

IPL 2022 Auction: बंगळुरुमध्ये ‘या’ तारखेला होऊ शकतो लिलाव
Omicron Update: ओमिक्रॉनमुळेच देशात येणार तिसरी लाट? आधीपेक्षा तीव्र की सौम्य? तज्ज्ञांचा अंदाज वाचायलाच हवा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें