vinesh phogat disqualified: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पी.टी.उषाशी चर्चा, अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय?
Female weight wrestling rules: पंतप्रधान नरेंद्र मोदी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पी.टी. उषा यांच्याकडून या विषयावर सविस्तर माहिती घेतली. तसेच विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली.

भारतीय क्रीडा क्षेत्र आणि क्रीडा प्रेमींना धक्का देणारी बातमी बुधवारी आली. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्याकडून संपूर्ण देश सुवर्णपदकाची अपेक्षा करत होता. त्यावेळी केवळ शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. आता विनेश फोगाट हिला कोणतेही पदक मिळणार नाही. यामुळे सर्व क्रीडाप्रेमी आणि देशवासीय नाराज झाले आहे. हातातोंडाशी आलेले पदक गेल्यानंतर संसदेत हा प्रश्न उपस्थित झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात तातडीने पावले उचलली आहे. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA)अध्यक्षा पी.टी.उषा यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रकरणाबाबत सखोल माहिती घेऊ पुढील पर्यायांवर चर्चा केली आहे.
नरेंद्र मोदी अन् पी.टी. उषा यांच्यात चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पी.टी. उषा यांच्याकडून या विषयावर सविस्तर माहिती घेतली. तसेच विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली. मोदी यांनी पी. टी. उषा यांना विनेशच्या प्रकरणात सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले. विनेशला मदत होणार नसेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, असेही त्यांनी पीटी उषा यांना सांगितले आहे.
नरेंद्र मोदी यांनी मांडल्या भावना
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अपात्र ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी विनेशलाही प्रोत्साहन दिले आहे. त्याने ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले की, विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस. प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहे. आजचे अपयश दुखावत आहे. त्यासंदर्भात मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना मी शब्दात मांडू शकत नाही. आव्हानांना सामोरे जाणे हा तुझा स्वभाव राहिला आहे. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.
हे ही वाचा
आता विनेश फोगाट रौप्य पदक तरी मिळणार का? अपील करता येणार का?
