wrestling rules olympics: आता विनेश फोगाट रौप्य पदक तरी मिळणार का? अपील करता येणार का?

vinesh phogat disqualified: सुवर्णपदकाच्या लढतीतून अपात्र ठरलेली विनेश आता सुवर्णपदक किंवा रौप्यपदक मिळणार नाही. कारण तिचे वजन 50 किलो गटात सुमारे 100 ग्रॅम अधिक आले. आता या प्रकारात फक्त दोन कुस्तीपटूंना पदके दिली जातील, त्यापैकी एक सुवर्णपदक जिंकणारा यूएसएचा कुस्तीपटू आणि दुसरा कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू असणार आहे.

wrestling rules olympics: आता विनेश फोगाट रौप्य पदक तरी मिळणार का? अपील करता येणार का?
vinesh phogat
| Updated on: Aug 07, 2024 | 1:09 PM

wrestling rules olympics: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारताला धक्का देणारी बातमी आली आहे. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने मंगळवारी रात्री मिळवलेल्या विजयाचा जल्लोष देश साजरा करत असताना बुधवारी भारताला धक्का बसला आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीत असणारी विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र घोषीत करण्यात आले आहे. यामुळे आता सुवर्णपदक नाही तर रौप्य पदक मिळेल का? अशी अशा वाटत होती. परंतु तिला आता कोणतेही पदक मिळणार नाही. तसेच अपीलसुद्धा करता येणार नाही.

100 ग्रॅम वजन जास्त आले अन् संधी गेली

विनेश फोगाट हिने मंगळवारी 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे तिला सुवर्णपदकाची दावेदारी मानले जात होते. परंतु 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अंतिम सामन्यातून त्याला अपात्र ठरवण्यात आले होते. यामुळे बुधवारी यूएसए कुस्तीपटूविरुद्ध तिचा सुवर्णपदकासाठी होणारा सामना ती खेळू शकणार नाही. तसेच विनेशला आता या अपीलसुद्धा करता येणार नाही.

53 किलो गटात येत होती समस्या

सुवर्णपदकाच्या लढतीतून अपात्र ठरलेली विनेश आता सुवर्णपदक किंवा रौप्यपदक मिळणार नाही. कारण तिचे वजन 50 किलो गटात सुमारे 100 ग्रॅम अधिक आले. आता या प्रकारात फक्त दोन कुस्तीपटूंना पदके दिली जातील, त्यापैकी एक सुवर्णपदक जिंकणारा यूएसएचा कुस्तीपटू आणि दुसरा कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू असणार आहे. विनेशला कोणतेही पदक मिळणार नाही, यामुळे भारताचे एक ऑलिम्पिक पदक कमी झाले आहे. विनेश यापूर्वी 53 किलो गटातून खेळत होती. त्यावेळीही तिला ऑलिम्पिक पात्रता फेरीत अशाच समस्येचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, विनेश फोगाट हिचे पदक जरी हुकले असले तरी देशभरातून तिच्यावर गौरव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश फोगाट हिला देशाचा गौरव असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस! तुम्ही भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात.