धक्कादायक! महिला बॉक्सरचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांनी सांगितलं मृत्यूचं कारण

| Updated on: Sep 14, 2021 | 1:28 PM

अवघ्या 20 वर्षाच्या वयात या राष्ट्रीय स्थरावरील महिला बॉक्सरचा मृत्यू झाल्याने डेहरादून हादरलं आहे. हेमलता उर्फ हेमा दानू असं या मुलीचं नाव असून तिच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूचं कारण सांगितलं आहे.

धक्कादायक! महिला बॉक्सरचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांनी सांगितलं मृत्यूचं कारण
हेमा दानू
Follow us on

डेहराडून: नुकत्याच टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics) पार पडल्या. यामध्ये भारताच्या महिला खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ‘हम भी किसीसे कम नही हे’ दाखवून दिलं. अलीकडे भारताचा महिला क्रिकेट संघही दमदार  कामिगरी करत आहे. त्यामुळे एकीकडे महिला खेळाडू खेळांमध्ये भारताचा झेंडा फडकावत असताना एका राष्ट्रीय स्तरावरील महिला बॉक्सरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे MBPG कॉलेजमध्ये एम एच्या दुसऱ्या वर्षांत शिकणारी विद्यार्थीनी हेमलता उर्फ हेमा दानू हीचा रविवारी उशीरा संशयास्पद मृत्यू झाला.

ती उत्तराखंडच्या कपकोट येथील बडेत (कफलानी) या ठिकाणची रहिवाशी होती. सध्या शिक्षणासाछी ती हल्द्वानीमध्ये रहात होती. कृपाल सिंह यांची 20 वर्षीय मुलगी हेमा कुमाऊं विश्वविद्यालयात शिकत होती. दरम्यान नुकतचं 10 सप्टेंबर रोजी ती खटीमा येथे एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाली होती. त्यानंतर रविवारी तिची प्रकृती बिघडलेल्या अवस्थेत ती सापडली असात तिला नैनीतालमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी उपचारादरम्यान तिचा रात्री दी़डच्या सुमारास मृत्यू झाला.

‘पंचाचा चूकीचा निर्णय मृत्यूला जबाबदार’

अद्याप मृत्यूचं नेमकं कारण कळालं नसलं तरी अशा अचानक मृत्यूमुळे हेमाच्या घरचे मात्र हादरले आहेत. त्यांनी पोलिसांशी बोलताना ती नुकत्याच झालेल्या खटीमा येथील एका सामन्यात पराभवानंतर फार तणावात होती. यावेळी ती पंचाच्या चूकीच्या निर्णयामुळे पराभूत झाल्याचंही तिने म्हटलं होतं. त्यामुळेच तिने तणावाखाली विष खाऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

हे ही वाचा-

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत सस्पेन्स संपला, BCCI सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य!

T20 World Cup पूर्वी जागतिक क्रिकेटमधील स्टार खेळाडूची निवृत्ती, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

(Woman boxer hemlata danu death in suspicious circumstances family says shes in tension)