PAK vs ENG : भारतात टेस्ट सिरीजचे लाइव्ह टेलिकास्ट कधी आणि कोणत्या चॅनलवर होणार, कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या सर्व काही

| Updated on: Nov 29, 2022 | 12:45 PM

इंग्लंड पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी सामने होणार आहेत

PAK vs ENG : भारतात टेस्ट सिरीजचे लाइव्ह टेलिकास्ट कधी आणि कोणत्या चॅनलवर होणार, कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या सर्व काही
Babar Azam
Follow us on

मुंबई : पाकिस्तान (PAK) आणि इंग्लंड (ENG) यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. जवळपास 17 वर्षानंतर पाकिस्तानमधील मैदानात कसोटी मालिका होणार आहे. सध्या दोन्ही टीममध्ये चांगले खेळाडू असून कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नुकताच ऑस्ट्रेलियात (AUS) झालेला विश्वचषक इंग्लंड टीमने जिंकला. त्यामुळे खेळाडूंचे मनोबल चांगलेचं उंचावले आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला.

इंग्लंड पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी सामने होणार आहेत. पहिला सामना रावळपिंडीमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना मुल्तानच्या मैदानावर होणार आहे. तर तिसरा सामना कराचीमध्ये होणार आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता कसोटी सामना सुरू होईल.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तान संघ : बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, शान मसूद, सौद शकील, सलमान आगा, नसीम शाह, नौमन अली, अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, अबरार अहमद, जाहिद मेहमूद, मोहम्मद नवाज, अझहर अली, मोहम्मद अली

इंग्लंड संघ: बेन स्टोक्स , जेम्स अँडरसन, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, विल जॅक्स, कीटन जेनिंग्ज, जॅक लीच, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, मार्क वुड रेहान अहमद