आशिया कप स्पर्धेतून पाकिस्तान आणि ओमान आऊट, झालं असं की….

आशिया कप स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बांगलादेशला संधी मिळाली आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

आशिया कप स्पर्धेतून पाकिस्तान आणि ओमान आऊट, झालं असं की....
आशिया कप स्पर्धेतून पाकिस्तान आणि ओमान आऊट, झालं असं की....
Image Credit source: Asia Hockey Federation/ Instagram
| Updated on: Aug 19, 2025 | 9:20 PM

आशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून अवघ्या काही दिवसात थरार रंगणार आहे. आशिया हॉकी कप स्पर्धा 29 ऑगस्टपासून बिहारच्या राजगीरमध्ये सुरु होणार आहे. पण या स्पर्धेतून पाकिस्तान आणि ओमान हे संघ आऊट झाले आहेत. त्यांच्या जागी स्पर्धेत बांग्लादेश आणि कझाकस्तान खेळणार आहे. मंगळवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारत सरकार पाकिस्तानी केळाडूंना विजा देण्यास तयार होता. पण पाकिस्तान हॉकी महासंघाने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येण्यास नकार दिला. दुसरीकडे ओमान देखील या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

यजमान भारत संघ चीन, जापान आणि कझाकस्तानसह गट अ मध्ये आहे. तर गट ब मध्ये मलेशिया, कोरिया, चायनीज तैपेई आणि बांग्लादेश हे संघ आहेत. या आठ संघापैकी विजेत्या संघाला नेदरलँड आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या 2026 वर्ल्डकप स्पर्धेत थेट स्थान मिळणार आहे.आशिया कपमधून माघार घेतल्याने पाकिस्तानने विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याची संधी गमावली आहे. खरंतर आशिया कप जिंकणाऱ्या संघाला विश्वचषकाचे तिकीट मिळते.

आशिया कप हॉकी 2025स्पर्धेचे वेळापत्रक जाणून घ्या:

29 ऑगस्ट:

मलेशिया विरुद्ध बांगलादेश (गट ब)

कोरिया विरुद्ध चायनीज तैपेई (गट ब)

जपान विरुद्ध कझाकस्तान (गट अ)

भारत विरुद्ध चीन (गट अ)

30 ऑगस्ट

बांगलादेश विरुद्ध चायनीज तैपेई (गट ब)

कोरिया विरुद्ध मलेशिया (गट ब)

31 ऑगस्ट

चीन विरुद्ध कझाकस्तान (गट अ)

जपान विरुद्ध भारत (गट अ)

1 सप्टेंबर

बांगलादेश विरुद्ध कोरिया (गट ब)

मलेशिया विरुद्ध चायनीज तैपेई (गट ब)

चीन विरुद्ध जपान (गट अ)

भारत विरुद्ध कझाकस्तान (गट अ)

7 सप्टेंबर

अंतिम सामना आणि इतर स्थानांचे सामने