Pakistan Team : पाकिस्तानी खेळाडूंनी बिर्याणी खाऊन 20 किलो वजन वाढवले, अक्रम भडकला

अक्रम म्हणाला खेळाडूंची पाकिस्तान क्रिकेट बोर्डने महिन्याला फिटनेस टेस्ट करायला हवी.

Pakistan Team : पाकिस्तानी खेळाडूंनी बिर्याणी खाऊन 20 किलो वजन वाढवले, अक्रम भडकला
pakistan team
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 14, 2022 | 2:49 PM

मुंबई : पाकिस्तानच्या टीमचा (Pakistan Team) काल पराभव झाल्यापासून खेळाडूंवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जोरदार टीका होत आहे. इंग्लंडच्या टीमने (Eng) चांगली खेळी केल्यामुळे त्याचा विजय झाला. इंग्लंडच्या खेळाडूंनी विजयानंतर मैदानात जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे कालच्या मॅचनंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हक याने पाकिस्तान खेळाडूंवर मोठा आरोप केला आहे.

काल ज्यावेळी पाकिस्तानच्या टीमचा पराभव झाला, त्यावेळी मिस्बाह उल हक याने पाकिस्तानचे खेळाडू मिळालेल्या सुट्टीत बिर्याणी खाऊन 20 किलो वजन वाढवतात असा आरोप केला आहे. त्यावर वसिम आक्रम जाम भडकला होता. अक्रम म्हणाला खेळाडूंची पाकिस्तान क्रिकेट बोर्डने महिन्याला फिटनेस टेस्ट करायला हवी.

ज्यावेळी मिसबाह पाकिस्तान टीमचा प्रशिक्षक होता, त्यावेळी तो टीममधील खेळाडूंचं आठवड्याला किंवा दोन आठवड्याला वजन चेक करायचा. खेळाडूंचं वजन 20 किलोने वाढलेलं असायचं. दाबून बिर्याणी, रोटी खाल्ल्यास असंच होणार असं मिसबाह टिव्ही शोच्या कार्यक्रमात म्हणाला.

फिटनेस चाचणी घेतली, तरी पाकिस्तानी टीममधील खेळाडूंची अतिरिक्त चरबी कमी होणार नसल्याचे शोएब मलिकने टीव्हीच्या शोमध्ये स्पष्ट केले. एका यूजरच्या ट्विटवर वसीम अक्रम जाम भडकला होता. अक्रमने त्याचं नाव टिव्हीच्या शोमध्ये घेऊन तुम्हाला कोणाशी कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही का ? खेळाडूंशी गैरवर्तन करत आहात असंही वसिम आक्रम म्हणाला.