पाकिस्तान क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे (Pakistan three Cricketer test report Corona Positive)

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण
| Updated on: Jun 23, 2020 | 12:36 AM

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे (Pakistan three Cricketer test report Corona Positive). पाकिस्तानचे खेळाडू शादाब खान, हारिस रऊफ आणि हैदर अली यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली (Pakistan three Cricketer test report Corona Positive).

“इंग्लंड दौऱ्याअगोदर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंची रावलपिंडी येथे चाचणी करण्यात आली. या चाचणीत तीन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, या खेळाडूंमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत. या तीनही खेळाडूंवर उपचार सुरु असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे”, असं स्पष्टीकरण पाकिस्तान क्रिकट बोर्डाकडून देण्यात आलं आहे.

पाकिस्तानची 29 सदस्यीय क्रिकेट टीम 28 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने शनिवारी (20 जून) याबाबत माहिती दिली होती. या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचा संघ तीन टी-20 आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे. मात्र, त्याअगोदर संघातील तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची वाईट बातमी समोर आली आहे.

हेही वाचा : सौम्य लक्षणं असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांचा उपचार

पाकिस्तानच्या माजी कर्णधारालाही कोरोनाची लागण

शादाब खान, हारिस रऊफ आणि हैदर अली यांच्याअगोदर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला ‘कोरोना’ची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. खुद्द आफ्रिदीनेच आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

प्रकृती बिघडल्यामुळे शाहीद आफ्रिदीने ‘कोरोना’ चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. “माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा”, असे आवाहन आफ्रिदीने ट्विटरवरुन केले होते.

पाकिस्तानात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच आफ्रिदी पाकिस्तानमधील गरीब आणि गरजू नागरिकांना सतत मदत करत होता. तो आपल्या टीमसह पाकिस्तानच्या विविध भागात मदत साहित्य पुरवत होता.