Video: शमीची खराब फिल्डींग पाहून पांड्या आणि रोहित संपातला, आयसीसीने शेअर केला व्हिडीओ

| Updated on: Nov 12, 2022 | 9:52 AM

आयसीसीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Video: शमीची खराब फिल्डींग पाहून पांड्या आणि रोहित संपातला, आयसीसीने शेअर केला व्हिडीओ
hardik pandya
Image Credit source: bcci
Follow us on

मुंबई : टीम इंडियाने (Team India) सेमीफायनच्या मॅचमध्ये (Semifinale) अनेक चुका केल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडकडून (ENG) पराभव झाला. टीम इंडियाचा महत्त्वाचा फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक पुर्ण केलं, तसेच हार्दीक पांड्याने धुवाधार अर्धशतकी पारी खेळली म्हणून टीम इंडियाची धावसंख्या 168 पर्यंत गेली. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला इंग्लंडच्या खेळाडूला बाद करता आले नाही.

टीम इंडियाची 9 वी ओव्हर सुरु होती, त्याचवेळी हार्दीक पांड्या गोलंदाजी करीत होता. इंग्लंडच्या खेळाडूने हार्दीकने टाकलेला चेंडू त्याच्या अनोख्या शैलीने मागच्या बाजूला टोलावला. त्यावेळी तो चेंडू शमीने अडवला आणि समोर असलेल्या भुवनेश्वर कुमारकडे फेकला. भुवनेश्वर कुमारच्या डोक्यावर तो चेंडू पुन्हा दुसरीकडे गेला. तोपर्यंत इंग्लंडच्या ओपनिंग जोडीने चार धावा पळून काढल्या. हे सगळं कृत्य पाहत असताना पांड्याचा पारा चांगलाचं चढला होता. तर रोहित ही चांगलाचं संतापला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

आयसीसीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्याला “हे काय होतं” असा आशय लिहिला आहे. क्रिकेटच्या चाहत्यांनी त्या व्हिडीओला अनेक कमेंट केल्या आहेत. तसेच अनेकांनी त्यावर कमेंटकरुन प्रश्न विचारले आहेत.

उद्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात एक महत्त्वाचा सामना होणार आहे. दोन्ही टीम सध्या कसून सराव करीत आहे.