
भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील सहावा दिवस (1 ऑगस्ट) ऐतिहासिक ठरला. भारताला तिसरं पदक मिळालं. भारताचा नेमबाज कोल्हापूरकर स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक जिंकूून इतिहास घडवला. स्वप्निल महाराष्ट्राकडून भारताला पदक मिळवून देणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याआधी 72 वर्षांआधी 1952 साली कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं. तसेच दिवसभर भारताच्या काही खेळाडूंनी विजय मिळवत आपलं आव्हान कायम ठेवलंय. तर काहींचं पराभवासह आव्हान संपुष्ठात आलं आहे.
भारतासाठी सहावा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक मिळवून दिलं. त्यामुळे भारताच्या पदकाची संख्या 3 झाली. आता भारतीय खेळाडू सातव्या दिवशी खेळण्यासाठी सज्ज आहेत. जाणून घ्या भारताचं 2 ऑगस्टच वेळापत्रक.
टीम इंडियाचं 2 ऑगस्टचं वेळापत्रक
India’s schedule for Day 7⃣ at #ParisOlympics2024. #TeamIndia🇮🇳 is set for yet another comprehensive day at #ParisOlympics2024.
Judoka @tulika_maan is all set for her #Olympic debut, @Tajinder_Singh3 is set to compete in Men’s Shotput qualification.
Check out all the other… pic.twitter.com/GDEQvDFrSv
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2024
भारताला सहाव्या दिवशी नेमबाज स्वप्निल कुसाळे याने भारताला तिसरं आणि कांस्य पदक मिळवून दिलं. भारताचं हे एकूण आणि नेमबाजीतील तिसरं पदक ठरलं. तसेच काही खेळाडूंनी विजय मिळवत पदकाचं स्वप्न कायम राखलंय. तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला. महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीचा पराभव झाला आणि पदकाच्या हॅटट्रिकची संधी हुकली. बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. लक्ष्य सेनने एचएस प्रणॉयचा पराभव केला. अंजुम मुद्गिल आणि सिफ्त कौर सामरा महिला शूटिंग 50 मीटर एअर रायफल 3 पोजिशंस प्रकारात पराभूत झाल्या. प्रियंका गोस्वामी महिला 20 किमी वॉकिंग स्पर्धेतून बाहेर झाली. हॉकी टीम इंडियाला बेल्जिमयने पराभूत केलं.
भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीचा पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील प्री क्वार्टर फायनलमधील सामन्यात पराभव झाला आहे. चीनच्या गे बिंग जियाओने सिंधूचा पराभव केला. चीनच्या खेळाडूने हा सामना 21-19 आणि 21-14 अशा फरकाने जिंकला. सिंधूच्या पराभवासह तिचं स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. सिंधूसमोर चीनच्या गे बिंग जियाओचं आव्हान आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत लक्ष्य सेन याने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. लक्ष्यचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. लक्ष्यने दुसऱ्या सामन्यात प्रणॉयचा 21-6 फरकाने धुव्वा उडवला आहे.
लक्ष्य सेनची एचएस प्रणॉयवर मात
🚨 Badminton – Lakshya Sen moves into the QF after a win against fellow 🇮🇳 shuttler HS Prannoy. pic.twitter.com/kKCLRPVUMj
— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2024
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा पुरुष दुहेरी प्रकारात क्वार्टर फायलनमध्ये पराभव झाला आहे. या जोडीचं पराभवासह पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं आहे. या जोडीने पहिल्या सेटमध्ये विजय मिळवून चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर ते पिछाडीवर पडले आणि पराभूत झाले. सात्विक आणि चिरागला मलेशियाच्या जोडीकडून 21-13, 14-21 आणि 16-21 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
अंजुम मुद्गिल आणि सिफ्त कौर सामरा महिला शूटिंग 50 मीटर एअर रायफल 3 पोजिशंस प्रकारातून बाहेर झाल्या आहेत. अंजुम पात्रता फेरीत 584 पॉइंट्ससह 18व्या आणि सिफ्त 575 पॉइंट्ससह 31 व्या स्थानी राहिली. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी टॉप 8 मध्ये येणं बंधनकारक होतं. मात्र त्यात दोघीही अपयशी ठरल्या.
पुण्यातील डेक्कन परिसरातील झेड ब्रीज खाली असणाऱ्या अनधिकृत आस्थापनांनवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे . शहरभर महापालिकेकडून बांधकामावर कारवाई अजूनही सुरूच आहे. महापालिका अधिकारी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात झेड ब्रिज खालच अतिक्रमण पालिकेने हटवलं आहे.
ऑलिम्पिक पदक विजेता सरबज्योत सिंगचा देशात परतल्यावर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
#WATCH | Union Sports Minister Mansukh Mandaviya felicitates Olympic medalist Sarabjot Singh, who won bronze in the 10m Air Pistol Mixed team event at #ParisOlympic2024 pic.twitter.com/Ilg5KcrIlP
— ANI (@ANI) August 1, 2024
भारतासाठी वाईट बातमी समोर आली आहे. प्रियंका गोस्वामी महिला 20 किमी वॉकिंग स्पर्धेतून बाहेर झाली आहे. प्रियंकाची निराशाजनक कामगिरी राहिली. प्रियंकाला या प्रकारात 45 पैकी 41व्या स्थानी समाधान मानावं लागलं.
महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिसरं आणि पहिलं वैयक्तिक पदक मिळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्निलच्या या कामगिरीसाठी त्याचं अभिनंदन केलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वप्निलला मोठं आश्वासन दिलं आहे. “स्वप्निलला जी काही मदत पाहिजे असेल ती राज्य सरकारकडून दिली जाईल”, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
VIDEO | “I congratulate Swapnil Kusale for winning the bronze medal in Olympic (Men’s 50m rifle shooting). He is the pride of Maharashtra. I congratulate his family and coach also. This is the third medal for India in Olympic. Maharashtra government will felicitate him,” says… pic.twitter.com/H51XMZLw6F
— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2024
बेल्जियमने हॉकी टीम इंडियाचा 2-1 अशा फरकाने धुव्वा उडवला आहे. बेल्जियमने या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताचा हा पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिला पराभव ठरला आहे.
हॉकी टीम इंडिया विरुद्ध बेल्जियम यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. बेल्जियमने आपल्या गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे भारतासमोर बेल्जियमचं तगडं आव्हान असणार आहे.
कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने भारताला रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक मिळवून दिलं आहे. यासह भारताचं हे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं पदक ठरलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा डंका
OLYMPIC BRONZE MEDALIST SWAPNIL KUSALE. What an incredible performance. Consistent from start to end bringing us our 3rd Bronze Medal in shooting and at @paris2024. #JeetKaJashn #Cheer4Bharat #IndiaAtParis24 pic.twitter.com/57B0bYCyRb
— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2024
कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळे याचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल थ्री पोजिशनमधील पदकाचा सामना सुरु आहे. भारताला तिसरं पदक मिळण्याची शक्यता आहे. स्वप्निल भारताला पदक मिळवून देणार का? याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे.