World Cup : भारत-पाकिस्तान सामनाही पावसात वाहून जाणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रेफोर्ड क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.

World Cup : भारत-पाकिस्तान सामनाही पावसात वाहून जाणार?
| Edited By: | Updated on: Jun 15, 2019 | 5:14 PM

India vs Pakistan | मँचेस्टर (इंग्लंड) : भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत आहे. क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे. विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला. त्यानंतर आता भारत पाकिस्तानशी मुकाबला करण्यास सज्ज आहे.

दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला. एक सामना रद्द झाला.

पावसाचं सावट?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रेफोर्ड क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान म्हटल्यावर सामना रोमांचक होणार, हे निश्चित. मात्र, वर्ल्डकपमधील विविध सामन्यांमध्ये पावसाचा येणारा व्यत्यय पाहता, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अनेक क्रिकेटरसिक साशंक आहेत.

वर्ल्डकपमधील आतापर्यंतच्या 19 सामन्यातील चार सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यातच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे या हायव्होल्टेज सामन्यातही क्रिकेट रसिकांच्या हाती निराशा येऊ शकते.

World Cup : पावसामुळे क्रिकेट मॅच रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का?

या आठवड्यात ज्या सामन्यांदरम्यान पाऊस पडला, त्यावेळी क्युरेटर आणि मैदानातील कर्मचाऱ्यांच्या सजगतेमुळे पिच सुकलेली राहिली. मैदानाच्या इतर भागाला मात्र पावसाने पार ओलेचिंब केले होते. कारण एवढा मोठा भाग तातडीने कव्हर करणं शक्य नसतं.

16 जूनला, रविवारी म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी दुपारी हलकासा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मँचेस्टरमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. स्थानिक वेळेनुसार मँचेस्टरमध्ये सामना सकाळी 10.30 वाजता सुरु होईल, त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीला काहीच अडथळा येणार नसल्याचे दिसते आहे. मात्र सामना मध्यावर आल्यानंतर पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.

पावसाच्या व्यत्ययामुळे वर्ल्डकपमधील सामने रद्द होत असल्याने, क्रिकेट रसिकांनी आयसीसीवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केलं गेलं.

India vs Pakistan : मॅच पाहण्यासाठी मुलाला घेऊन सानिया स्टेडियममध्ये, भारत-पाक सामन्यात कुणाला पाठिंबा?

जबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो!

India vs Pakistan : मोहम्मद आमीरवर हल्ला चढवा, सचिनचा विराट-रोहितला सल्ला

भारत-पाक सामना, एका तिकिटाची किंमत तब्बल 60 हजारांच्याही पुढे

हॉटेलमध्ये सुविधा नाही, प्रायव्हेट जिममध्ये वर्कआऊट, भारतीय संघाची मजबुरी