World Cup : पावसामुळे क्रिकेट मॅच रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का?

पावसामुळे सामना रद्द झाला किंवा मध्येच थांबवण्यात आला, तर यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे मैदानावरील प्रेक्षकांचं होतं. अनेक प्रेक्षक हे दुसऱ्या देशातून सामने बघायला येत असतात. अशात जर सामना रद्द झाला तर त्यांना सामन्याचा आनंद तर घेता येत नाहीच, त्याशिवाय त्यांचं आर्थिक नुकसानही होतं.

Could fans get the refund for ticket, World Cup : पावसामुळे क्रिकेट मॅच रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का?

लंडन : विश्वचषक 2019 मध्ये भारत विरुद्ध न्यूजीलंड सामना पावसामुळे रद्द झाला. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर गुरुवारी (13 जून) हा सामना खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे अखेर हा सामना रद्द करण्यात आला. यंदाच्या विश्वचषकात पावसामुळे रद्द होणारा हा चौथा सामना होता. याशिवाय एक सामना हा पावसामुळे मध्येच थांबवावा लागला. 18 सामन्यांपैकी 5 सामन्यांवर पावसाचा परिणाम पाहायला मिळाला.

पावसामुळे सामना रद्द झाला किंवा मध्येच थांबवण्यात आला, तर यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे मैदानावरील प्रेक्षकांचं होतं. अनेक प्रेक्षक हे दुसऱ्या देशातून सामने बघायला येत असतात. अशात जर सामना रद्द झाला तर त्यांना सामन्याचा आनंद तर घेता येत नाहीच, त्याशिवाय त्यांचं आर्थिक नुकसानही होतं.

पावसामुळे कुठलाही सामना रद्द झाला तर आयोजकांनाही याचा मोठा फटका बसतो. तसेच, प्रायोजक, टेलिकास्ट कंपन्या आणि तिकीट विक्रेते यांनाही मोठं नुकसान सहन करावं लागतं.

पण, सामन्यांच्या तिकिटांवर इतके पैसे खर्च करणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळतात का? हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात येत असेल. जर प्रेक्षकांनी तिकीट खरेदी केलं आहे, पण त्यांना सामनाचं बघायला मिळाला नाही तर त्यांच्या पैशांचं काय होत असेल? आयसीसी विश्वचषकच्या रेन पॉलिसीमध्ये तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे.

जर एखादा सामना कुठल्याही कारणाने निश्चित ठिकाणी झाला नाही. तर त्या सामन्यासाठी खरेदी केलेल्या तिकिटाची मूळ रक्कम परत मिळवण्यासाठी खरेदीदार दावा करु शकतो.

  • खराब हवामानामुळे जर 15 षटकापेक्षा कमी षटकांचा सामना झाला तर पूर्ण पैसे रिफंड होतात.
  • जर 15.1 ते 29.5 षटकांपर्यंत सामना झाला तर 50% पैसे रिफंड होतात.

म्हणजे जर तुम्हीही कुठल्या सामन्याचं तिकीट घेतलं असेलं आणि पावसामुळे तो सामना रद्द झाला असेल किंवा 30 पेक्षा कमी षटकांचा झाला असेल, तर तुम्ही तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी दावा करु शकता.

16 जूनला भारचत-पाक सामना

भारताचा पुढील सामना हा पाकिस्तान विरुद्ध आहे. येत्या 16 जूनला मँचेस्टरच्या के ओल्ड ट्राफ्फोर्ड मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर निश्चितच दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी निराश होतील. मात्र, सध्याचं इंग्लंडचं वातावरण बघता यंदाचा विश्वचषक हा रामभरोसे आहे.

संबंधित बातम्या :

#ShameOnICC : ढिसाळ नियोजन, सोशल मीडियावर ICC ट्रोल

भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सराव, धोनी पाकिस्तानसाठी रणनीती आखत होता

World Cup : ‘या’ दोन संघात फायनल होणार, गुगल सीईओ सुंदर पिचाई यांची भविष्यवाणी

भारत वि. न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द, आता पुढे काय?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *