हॉटेलमध्ये सुविधा नाही, प्रायव्हेट जिममध्ये वर्कआऊट, भारतीय संघाची मजबुरी

यंदाच्या विश्वचषक सामन्यात आयसीसीवर (इंडियन क्रिकेट कॉऊन्सिल) अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 2019 च्या विश्वचषकाच्या तयारीमध्ये आयसीसी अनेक ठिकाणी कमी पडत असल्याचे समोर आलं आहे.

हॉटेलमध्ये सुविधा नाही, प्रायव्हेट जिममध्ये वर्कआऊट, भारतीय संघाची मजबुरी

नवी दिल्ली : यंदाच्या विश्वचषक सामन्यात आयसीसीवर (इंडियन क्रिकेट कॉऊन्सिल) अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 2019 च्या विश्वचषकाच्या तयारीमध्ये आयसीसी अनेक ठिकाणी कमी पडत असल्याचे समोर आलं आहे. त्यातच आता इंडियन क्रिकेट टीमलाही वर्कआऊटसाठी हॉटेलमध्ये पर्यायी सुविधा नसल्याने प्रायव्हेज जिममध्ये जावे लागत आहे. यावर अनेक जणांनी तसेच क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीवर नाराजी दर्शवल्याचे म्हटलं जात आहे.

वर्कआऊटसाठी हॉटेलमध्ये पर्यायी सुविधा नाही

असं समजलं आहे की, आयसीसीने भारतीय खेळाडूंना एका प्रायव्हेट जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी सांगितले, कारण ते ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत तेथे वर्कआऊटसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नाही. खेळाडूंसाठी बुक केलेल्या हॉटेलमधील जिममध्ये गरजेच्या मशीन उपलब्ध नाहीत. यामुळे भारतीय खेळाडूंना वर्कआऊट करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना राहण्यासाठी ठेवण्याता आलेल्या हॉटेलमधील जिममध्ये खेळाडूंसाठी उपयोगी जिम मशीन नसल्याने खेळाडूंना सध्या प्रायव्हेट जिममध्ये वर्कआऊट करत आहेत.

याशिवायही अनेक समस्यांना खेळाडूंना सामोरे जावे लागत आहे. सामन्या दरम्यान खेळाडूंना आपल्या फिटनेसवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. पण जर खेळाडूंना पुरेशी सुविधा दिली जात नसेल, तर खेळाडूंचे नुकसान होत आहे. सुत्रांनी म्हटल्याप्रमाणे, “ब्रिटनच्या हॉटेलमध्ये जिम आणि स्वीमिंग पूलसारख्या पर्यायी जागा नाहीत. अशा सुविधा फक्त काही हॉटेलमध्ये आहेत, यासाठी इंग्लंडला या गोष्टीत बदल करण्याची गरज आहे”.

खेळाडूंची सुरक्षा

भारतीय खेळाडूंच्या चाहत्यांची संख्या पाहिली तर ती अधिक आहे. यामुळे हॉटेलमध्ये त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. येथे मोठ्या प्रमाणात चाहते खेळाडूंना पाहण्यासाठी हॉटेलमध्ये येतात. तसेच भारतीय संघासाठी अनेक प्रतिबंध लागू केले आहेत आणि या प्रतिबंधामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागते.

याशिवाय भारतीय क्रिकेटरना प्रवासा दरम्यानही अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. खेळाडूंना बसमधून प्रवास करण्यसाठी सांगितले जात आहे. पण रेल्वेने प्रवास केला, तर वेळेची बचत होते. सुत्रांच्या मते, इंटरसिटी प्रवास अजूनही बसमधून होतो, तर इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये फुटबॉल खेळाडू वेळेत पोहचण्यासाठी रेल्वेमधून प्रवास करतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *